पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही:शिक्षणासह नोकरीची जबाबदारीही घेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही:शिक्षणासह नोकरीची जबाबदारीही घेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच या कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन देखील दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकवतीलच आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. परंतु, जे निष्पाप लोक या पहलगामच्या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्यांनी जे काही घटनाक्रम सांगितला तो अतिशय दुर्दैवी होती, अंगावर शहारे आणणारा होता. आपल्या महाराष्ट्रातले सहा, पुण्यातले दोन, पनवेलमधला एक आणि डोंबिवलीमधील तीन लोक हे त्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. आपल्या लाडक्या बहिणींना त्या दहशतवाद्यांनी सोडले परंतु कर्ता पुरुष, घरातला कुटुंब प्रमुख त्यालाच मारले. या कुटुंबांची परिस्थिती सर्वसामान्य आहे. आम्ही माहिती घेतली तर काहींचे शिक्षण सुरू आहे, कोणाच्या नोकरीचा विषय आहे, अनेक विषयांनी हे कुटुंब ग्रस्त आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली. हे सरकार या कुटुंबांच्या पाठीशी आहे तसेच त्यांना 50 लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी हा चांगला निर्णय घेतला. हे कुटुंब म्हणजे आमचे परिवार आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. इलेक्ट्रिक वाहनांवर सवलती देण्यात येणार प्रदूषण कमी करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक व्हेकलचे जे धोरण आणले आहे त्यात सुधारणा करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे. त्याचे प्रमोशन केले पाहिजे, सबसिडी दिला पाहिजे आणि काही रस्त्यांवर जे इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत असतील त्यांना सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. जसे केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे तसेच राज्य सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. तसेच जे काही सरकारी वाहन असतील त्या इलेक्ट्रिक असतील. चार्जिंग स्टेशन वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. देशावर दुर्दैवी हल्ला झाला, निरपराध लोक मारले गेले आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम मोदी करत आहेत. विदेश दौरा रद्द करत ते भारतात आले त्यांनी तातडीने बैठकी घेत मोठे निर्णय घेतले. सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेतला, पाकिस्तानी नागरिकांना परत तिकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी या दहशतवाद्यांना स्थान देण्याचे काम केले अशा लोकांचे घर बॉम्बने उडवण्यात आले आहेत. हे काम पंतप्रधान मोदी करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करणे हे दुर्दैवी आहे. काही लोक तर बैठकीला आले नाहीत, त्यांना काय म्हणायचे? असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानुसार पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये, तसेच रोजगाराचा प्रश्न असेल तर नोकरीची संधी दिली जाणार आहे. तसेच शिक्षणाचा प्रश्न असेल तर शिक्षणाचा खर्च देखील राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण फडणवीस यांनी सांगितले. हेही वाचा

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment