पहलगाम – प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन:अकोला आणि इतर ठिकाणच्या 30 पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था

पहलगाम – प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन:अकोला आणि इतर ठिकाणच्या 30 पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था

पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू-कश्मीर मध्ये अडकलेले आहेत. यातील अकोला इतर ठिकाणच्या 30 पर्यटकांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच या पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यानुसार उद्या या पर्यटकांना सुरक्षित परत आणले जाणार आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘काल पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून जम्मू काश्मीर मध्ये गेलेले अनेक पर्यटक अडकले आहेत. अकोला आणि इतर ठिकाणचे 30 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. याविषयी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्र सरकार उद्या सकाळी श्रीनगरला दोन विमाने पाठवत आहे. जेणेकरून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे राज्यात परत आणता येईल. जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत.’ महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील समावेश आहे. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत. यातील राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात मंत्री गिरीश महाजन हे जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment