पहलगामच्या आरोपींना पूर्णपणे संपण्याचे काम भारतीय सेना करेल:तिळमात्र शंका नसल्याचे म्हणत अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

पहलगामच्या आरोपींना पूर्णपणे संपण्याचे काम भारतीय सेना करेल:तिळमात्र शंका नसल्याचे म्हणत अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्याचा विचार ज्याच्या डोक्यात आला, त्याला पूर्णपणे संपवण्याचे काम भारतीय सेना करेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात अनेक कठोर भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले आहेत. ते याबाबत कठोर कारवाई करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. पुणे येथे आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालघर येथे मृत्यू मुखी पडलेल्या 27 भारतीय आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांना देखील आपण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र, ही घटना घडली असून आजही संपूर्ण भारत अक्षरशः याचा बदला घेतला पाहिजे, या मताचा आहे. त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, ही लोकांची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पाण्याचा किंवा इतर संदर्भातील गोष्टी असतील, पाकिस्तानशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. लोक पर्यटनासाठी जात असतात. त्यांच्यावर अशा पद्धतीने भ्याड हल्ले होतात. याचा सर्वजण तीव्र शब्दात निषेध करतात. या गोष्टी कदापि होता कामा नाही, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे ज्याच्या डोक्यातून ही गोष्ट पुढे आली आहे, त्या सर्वांना पूर्णपणे संपवण्याचे काम आपले भारतीय सैनिक करतील, यामध्ये माझ्या मनात तिळमात्र शंका नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.‌ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अजित पवार यांच्या हस्ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 43 दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… अजित पवार आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते:शिंदे गटाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितल्या मनातील भावना उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा आणि सकाळीच कामाला सुरुवात करण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी आज आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजताच हजेरी लावली. यावर अजित पवार हे आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असे म्हणत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दादांच्या कामाचे कौतुक केले आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment