पाकिस्तानला 24 तासात उत्तर द्यायला हवे होते:संजय राऊतांची टीका; म्हणाले- 27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, याला म्हणतात नेतृत्व. आता देखील पाकिस्तानला 24 तासाच्या उत्तर द्यायला हवे होते, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात कोणावर कारवाई करायची असेल तर ती देशाच्या गृह विभागावर कारवाई करा. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, मात्र सरकारच्या चुकांच्या पाठीशी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ला आणि काश्मीर संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मात्र सरकार असे अधिवेशन घेणार नाही. काश्मीर प्रश्नावर सरकार कोणालाही बोलू देणार नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…