पाकिस्तानी शस्त्रास्त्रांचा पाच राज्यांमधून ईशान्येकडे पुरवठा:सुगावा लागताच भारतीय तपास संस्था सतर्क

पाकिस्तानची आयएसआय भारतात अ‌शांतता निर्माण करण्यासाठी आता भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जातीयवादी वातावरणाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानमधून तस्करीद्वारे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची माेठी खेप जम्मू-काश्मीर, पंजाबद्वारे ईशान्येडील राज्यांत पाेहाेचवली जात आहे. त्यासाठी बिहार राज्याचा वापर एक ट्रान्झिट रुट व तस्करांसाठी शस्त्रास्त्रांचा साठा करण्यासाठी केला जात आहे. सूत्रानुसार या संबंधात अलीकडेच भारताच्या तपास संस्थेला काही इनपुट मिळाले आहेत. ते गृह मंत्रालय व भारताच्या इतर तपास संस्थांना पाठवण्यात आले. या गुप्त माहितीच्या आधारे गेल्या काही दिवसांत एनआयएने शस्त्र तस्कर ५ राज्यांत दडून बसल्याचे आणि त्यांच्या ५ संशयित अड्ड्यांवर छापेमारी केली. तेथे शस्त्रे तसेच राेख रक्कमही जप्त करण्यात आली हाेती. तस्करीच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणात शस्त्रे पाेहाेचवत आहेत. ट्रान्झिट रूट म्हणून बिहारचा तस्कराकडून वापर सूत्रानुसार गुप्त माहितीनुसार पाकिस्तानातून तस्करीद्वारे येणारी शस्त्रास्त्रे काश्मीरहून पंजाब-हरियाणा व उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये येतात. पुढे बिहारच्या १२ जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी जमा केली जातात. नंतर ती विकली जातात. तस्कर बिहारला हाॅल्ट कम ट्रान्झिट रूटसाठी वापरू लागले आहेत. मागणीनुसार या शस्त्रांचा पुरवठा नागालँड, मणिपूर व ईशान्येकडील राज्यांत केला जाताे. काही महिन्यांपूर्वी नागालँडमध्ये जप्त एके-४७ देखील बिहारमधून विकली गेली हाेती. एनआयएने केलेल्या तपासात बिहारमध्ये तस्करीचे काम करणाऱ्या १२ संशयितांची धरपकड केली. मणिपूरमधील हिंसाचारात बिहारच्या शस्त्रांची भूमिका सूत्र म्हणाले, पाकिस्तानातील व भारतातील काही शस्त्र तस्करांत डार्क वेबवरील झालेल्या संवादाला गुप्तचर संस्थेने इंटरसेप्ट केले हाेते. त्यावरून ईशान्येकडील राज्यांतील वातावरण खराब करण्यासाठी माेठ्या प्रमाणात बेकायदा शस्त्रे खरेदी केली जात आहेत. या शस्त्रांचे पैसे बिटकाॅइनने दिले गेले. तपास संस्था असे व्यवहार झालेल्या खात्यांची चाैकशी करत आहेत. एनआयए शस्त्र तस्करी टाेळीची धरपकड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर तपास केला जात आहे. काही दिवसांपूर्वी एनआयएने काश्मीरमध्ये एका ठिकाणी, पंजाब व हरियाणात प्रत्येकी एक आणि बिहारमध्ये १२ ठिकाणी छापे टाकून शस्त्रांचा माेठा साठा व १३ लाखांची राेकड जप्त केली हाेती. यादरम्यान एनआयएला शस्त्रास्त्रां तस्करीतील एका व्यक्तीची डायरीदेखील सापडली हाेती. या डायरीत देशभरातील शस्त्र तस्करांविषयीची महत्त्वाची माहिती तपास संस्थेच्या हाती लागली. मणिपूरमध्ये कुकी- मैतेईमधील जातीय हिंसाचार वाढण्यात बिहारमधून तस्करीद्वारे पाठवलेल्या शस्त्रास्त्रांची माेठी भूमिका राहिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment