लोकसभेनंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार:बजरंग सोनवणेंचा दावा, पंकजा-धनंजय मुंडेवरही केली टीका

लोकसभेनंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार:बजरंग सोनवणेंचा दावा, पंकजा-धनंजय मुंडेवरही केली टीका

लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांचा इफेक्ट राहणार, असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बीडमध्ये ओबीसी ओपन वाद नाही, काही लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी तो निर्माण केला होता, असे म्हणत सोनवणे यांनी अप्रत्यक्ष धनजंय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दहा वर्षे केंद्रात तुमची सत्ता होती, पण तुम्ही काय केले? असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठवाड्यात कशी स्थिती राहील याबाबत माहिती दिली. बजरंग सोनवणे म्हणाले, विधानसभा निडणुकीबाबत शरद पवारांची भेट घेतली. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तयारीला लागा, अशी सूचना पवार यांनी केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येण्यासाठी लोक इच्छुक आहेत. मात्र, पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा, हे शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवतील. पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे इफेक्ट राहणार आहे. बीड जिल्ह्यात ओबीसी ओपन असा वाद नाहीये. काही लोकांनी स्वत.च्या फायद्यासाठी हा वाद निर्माण केला होता. बीडमधील ज्या लोकांना आपली ताकद कमी आहे असे वाटते, ते लोक जातीचा फॅक्टर समोर आणत आहेत. मात्र, तो फॅक्टर चालणार नाही. लोकसभेला मला सर्व समाजातील लोकांनी मतदान केले आहे, असे म्हणत सोनवणे यांनी अप्रत्यक्ष धनंजय मुंडे यांना टोला लगावला. दहा वर्षांत तुम्ही काय केले?
बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे फक्त कोयता घासायला लावत आहेत. त्यांनी कधीतरी ऊस लावायला सांगावे. पण पाणी आणले असते, तर ऊस लावला असता. वेळोवेळी कोयता घासायला लावणे चांगले नाही. मागील दहा वर्षे केंद्रात तुमची सत्ता असताना तुम्ही काय केले? असा सवाल पंकजा मुंडे यांना नाव न घेता केला आहे. सरकारच्या निर्णयांवरही साधला निशाणा
बजरंग सोनवणे यांनी सरकारने मंत्रिमंडळात लावलेल्या निर्णयांच्या धडाक्यावर देखील टीका केली. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे योजनांचा धडाका लावला आहे. सरकारकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केल्या जात आहेत. या गोष्टी लोकसभा निवडणुकीआधी केल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती.

​लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांचा इफेक्ट राहणार, असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बीडमध्ये ओबीसी ओपन वाद नाही, काही लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी तो निर्माण केला होता, असे म्हणत सोनवणे यांनी अप्रत्यक्ष धनजंय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दहा वर्षे केंद्रात तुमची सत्ता होती, पण तुम्ही काय केले? असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठवाड्यात कशी स्थिती राहील याबाबत माहिती दिली. बजरंग सोनवणे म्हणाले, विधानसभा निडणुकीबाबत शरद पवारांची भेट घेतली. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तयारीला लागा, अशी सूचना पवार यांनी केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येण्यासाठी लोक इच्छुक आहेत. मात्र, पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा, हे शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवतील. पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे इफेक्ट राहणार आहे. बीड जिल्ह्यात ओबीसी ओपन असा वाद नाहीये. काही लोकांनी स्वत.च्या फायद्यासाठी हा वाद निर्माण केला होता. बीडमधील ज्या लोकांना आपली ताकद कमी आहे असे वाटते, ते लोक जातीचा फॅक्टर समोर आणत आहेत. मात्र, तो फॅक्टर चालणार नाही. लोकसभेला मला सर्व समाजातील लोकांनी मतदान केले आहे, असे म्हणत सोनवणे यांनी अप्रत्यक्ष धनंजय मुंडे यांना टोला लगावला. दहा वर्षांत तुम्ही काय केले?
बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे फक्त कोयता घासायला लावत आहेत. त्यांनी कधीतरी ऊस लावायला सांगावे. पण पाणी आणले असते, तर ऊस लावला असता. वेळोवेळी कोयता घासायला लावणे चांगले नाही. मागील दहा वर्षे केंद्रात तुमची सत्ता असताना तुम्ही काय केले? असा सवाल पंकजा मुंडे यांना नाव न घेता केला आहे. सरकारच्या निर्णयांवरही साधला निशाणा
बजरंग सोनवणे यांनी सरकारने मंत्रिमंडळात लावलेल्या निर्णयांच्या धडाक्यावर देखील टीका केली. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे योजनांचा धडाका लावला आहे. सरकारकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केल्या जात आहेत. या गोष्टी लोकसभा निवडणुकीआधी केल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment