परशुरामनगरला रोज 300 वाहनांची तपासणी:निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सीमेवर यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत, गुन्हेगारांवर वचक

परशुरामनगरला रोज 300 वाहनांची तपासणी:निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सीमेवर यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत, गुन्हेगारांवर वचक

प्रतिनिधी | नामपूर बागलाण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील परशुरामनगर नाकाबंदी येथे जायखेडा पोलिस व मुल्हेर दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्य नाकाबंदी मध्ये वाहन तपासणी चौकशीद्वारे रोज सरासरी ३०० वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारांवर त्यामुळे वचक बसला आहे. जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परशुरामनगर व कातरवेल येथे नाकाबंदी करण्यात आली असून जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोतम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वनविभाग, दारूबंदी, वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. रात्र दिवस यंत्रणा कार्यरत आहेत. अवैध दारू, शस्त्रे, पैसे आदींची वाहतूक होऊ नये. निवडणुका निकोप वातावरणात पार पडाव्यात, या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार परशुरामनगर व कातरवेल चौकी कार्यरत आहे. यावेळी दररोज चौकीत किमान २०० ते ३०० वाहनांची रोज तपासणी केली जाते. दिवसभरात आंतरराज्य चौकीवर किमान ४०० वाहनांची पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जात असल्याने इतर गुन्हेगारांवर वचक बसला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment