संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पुण्यात जनआक्रोश मोर्चा:पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, बजरंग सोनवणेसह प्रमुख नेत्यांचा सहभाग
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विविध मागण्यासाठी पुणे शहरामध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती – धर्मीय नागरिक सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये राज्यभरातील प्रमुख नेते सहभाग घेणार आहेत.