पाटणला विकास नाही तर बार वाढले:महाराष्ट्रातील हे पहिलेच भ्रष्टाचारी सरकार, जयंत पाटलांचा हल्लाबोल

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधत महायुती सरकारवर टीका केली आहे. पाटणला या मंत्रिमहोदयांच्या काळात विकास नव्हे, तर बीअर बार वाढले, असा टोला लगावला आहे. वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढले असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे. 84 वर्षाच्या योध्याच्या मागे जनता ठामपणे उभी
जयंत पाटील म्हणाले, आरोग्य, रस्ते, शेती पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यात महिलांवरील बलात्कार, बालकांवरील अत्याचार, महागाई वाढत आहे. वाय प्लस सुरक्षा असतानाही जर यांचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर स्थानिक जनता कशी सुरक्षित राहणार, असा प्रश्न देखील जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वांना तुतारी हाती घ्यायची आहे म्हणूनच राज्याच्या स्वाभिमानासाठी शरद पवार साहेबांसारख्या 84 वर्षाच्या योध्याच्या मागे जनता ठामपणे उभी आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या खुर्चीवर बेजबाबदार लोक
जयंत पाटील म्हणाले, निवडणूक तोंडावर असताना सरकारकडून कोट्यवधींच्या कामांच्या घोषणा केल्या जात असून योजनांचा पाऊस पाडला जात आहे. त्यातून टक्केवारी व भ्रष्टाचार बोकळला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे पहिलेच भ्रष्टाचारी सरकार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या खुर्चीवर बेजबाबदार लोक बसले आहेत. महाराष्ट्र विकण्याचे काम काहीजण करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पाटणला बार वाढले
पाटणच्या विकासावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात दोन पक्ष फोडून सत्तेत गेलेली लोक आपण प्रचंड विकास मतदारसंघात आणला अशा आविर्भावात आहेत. मी माहिती घेतली तर पाटणला काय वाढले? तर पाटणला बार वाढले. यासाठीच मंत्रिमंडळात जनतेने पाठवले आहे का? पाटणला रोजागराबरोबरच जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बहिणींसाठीचा कायदा अधिक बळकट करू
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमचे सरकार आल्यावर चालू योजना बळकट करू. बहिणींसाठीचा कायदा अधिक बळकट करू, बहिणीकडे बघायचे धाडस कोण करणार नाही. सरकारला स्वतःच्या सत्तेतील लोकांचे संरक्षण करता येत नाही. या विभागातील शिवसैनिक गद्दारांना शिक्षा देण्यासाठी आतूर झाले आहेत. मंत्रिपदाची झूल अंगावर असल्यावर काहीजण सुसाट असतात. मात्र लोक त्यांची झूल उतरवतील, त्यासाठी तुम्ही सत्यजित दादांना ताकद द्या. सत्यजितदादांना विजयी करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

​सातारा जिल्ह्यातील पाटण येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधत महायुती सरकारवर टीका केली आहे. पाटणला या मंत्रिमहोदयांच्या काळात विकास नव्हे, तर बीअर बार वाढले, असा टोला लगावला आहे. वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढले असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे. 84 वर्षाच्या योध्याच्या मागे जनता ठामपणे उभी
जयंत पाटील म्हणाले, आरोग्य, रस्ते, शेती पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यात महिलांवरील बलात्कार, बालकांवरील अत्याचार, महागाई वाढत आहे. वाय प्लस सुरक्षा असतानाही जर यांचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर स्थानिक जनता कशी सुरक्षित राहणार, असा प्रश्न देखील जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वांना तुतारी हाती घ्यायची आहे म्हणूनच राज्याच्या स्वाभिमानासाठी शरद पवार साहेबांसारख्या 84 वर्षाच्या योध्याच्या मागे जनता ठामपणे उभी आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या खुर्चीवर बेजबाबदार लोक
जयंत पाटील म्हणाले, निवडणूक तोंडावर असताना सरकारकडून कोट्यवधींच्या कामांच्या घोषणा केल्या जात असून योजनांचा पाऊस पाडला जात आहे. त्यातून टक्केवारी व भ्रष्टाचार बोकळला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे पहिलेच भ्रष्टाचारी सरकार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या खुर्चीवर बेजबाबदार लोक बसले आहेत. महाराष्ट्र विकण्याचे काम काहीजण करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पाटणला बार वाढले
पाटणच्या विकासावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात दोन पक्ष फोडून सत्तेत गेलेली लोक आपण प्रचंड विकास मतदारसंघात आणला अशा आविर्भावात आहेत. मी माहिती घेतली तर पाटणला काय वाढले? तर पाटणला बार वाढले. यासाठीच मंत्रिमंडळात जनतेने पाठवले आहे का? पाटणला रोजागराबरोबरच जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बहिणींसाठीचा कायदा अधिक बळकट करू
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमचे सरकार आल्यावर चालू योजना बळकट करू. बहिणींसाठीचा कायदा अधिक बळकट करू, बहिणीकडे बघायचे धाडस कोण करणार नाही. सरकारला स्वतःच्या सत्तेतील लोकांचे संरक्षण करता येत नाही. या विभागातील शिवसैनिक गद्दारांना शिक्षा देण्यासाठी आतूर झाले आहेत. मंत्रिपदाची झूल अंगावर असल्यावर काहीजण सुसाट असतात. मात्र लोक त्यांची झूल उतरवतील, त्यासाठी तुम्ही सत्यजित दादांना ताकद द्या. सत्यजितदादांना विजयी करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment