पातूर तालुक्यात ३२ गावांत ‘एक गाव एक गणपती’:गावातील तरुणाईचा पुढाकार; एकूण १७२ मंडळांकडून गणरायाची स्थापना

पातूर तालुक्यात ३२ गावांत ‘एक गाव एक गणपती’:गावातील तरुणाईचा पुढाकार; एकूण १७२ मंडळांकडून गणरायाची स्थापना

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. गणेशोत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ‘एक गाव एक गणपती” ही संकल्पना पुढे आली आहे. पातूर तालुक्यात एकूण १७२ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. यामध्ये एकूण ३२ गावांमध्ये ”एक गाव एक गणपती” यासाठी पुढाकार घेण्यात आला.‌ या मोहिमेत गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवात प्रत्येकजण दंग झाला आहे. शहरांमध्ये, गावांमध्ये ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाचा गजर होताना दिसत आहे. वातावरण भक्तिमय झाले आहे.‌लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करायला सुरुवात केली आणि बघता बघता या उत्सवाचे स्वरुप व्यापक झाले. या उत्सवाला सामाजिकतेचे, समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुढ झाली आहे. गावात सर्वांचा मिळून एकच गणपती बसवला जातो. गणपती उत्सवात गोळा होणाऱ्या वर्गणीतून गावाच्या विकासाची, समाजोपयोगी कामे होऊ लागली आहेत. यंदा पातूर तालुक्यात १७२ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकुण ९२गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये शहरी भागात २१ तर ग्रामीण भागात ७१ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यापैकी ‘एक गाव एक गणपती’ या मोहिमेत २० गावांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकुण ८० गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोन शहरी मंडळांचा सहभाग आहे तर ग्रामीण भागात ७८ गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद चान्नी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या १२ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमातून एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. आपसातील वैर नष्ट व्हावे, एकोपा कायम राहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा सूचना केल्याने “एक गाव एक गणपती’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. – रवींद्र लांडे , ठाणेदार, चान्नी.

​अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. गणेशोत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ‘एक गाव एक गणपती” ही संकल्पना पुढे आली आहे. पातूर तालुक्यात एकूण १७२ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. यामध्ये एकूण ३२ गावांमध्ये ”एक गाव एक गणपती” यासाठी पुढाकार घेण्यात आला.‌ या मोहिमेत गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवात प्रत्येकजण दंग झाला आहे. शहरांमध्ये, गावांमध्ये ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाचा गजर होताना दिसत आहे. वातावरण भक्तिमय झाले आहे.‌लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करायला सुरुवात केली आणि बघता बघता या उत्सवाचे स्वरुप व्यापक झाले. या उत्सवाला सामाजिकतेचे, समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुढ झाली आहे. गावात सर्वांचा मिळून एकच गणपती बसवला जातो. गणपती उत्सवात गोळा होणाऱ्या वर्गणीतून गावाच्या विकासाची, समाजोपयोगी कामे होऊ लागली आहेत. यंदा पातूर तालुक्यात १७२ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकुण ९२गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये शहरी भागात २१ तर ग्रामीण भागात ७१ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यापैकी ‘एक गाव एक गणपती’ या मोहिमेत २० गावांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकुण ८० गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोन शहरी मंडळांचा सहभाग आहे तर ग्रामीण भागात ७८ गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद चान्नी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या १२ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमातून एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. आपसातील वैर नष्ट व्हावे, एकोपा कायम राहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा सूचना केल्याने “एक गाव एक गणपती’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. – रवींद्र लांडे , ठाणेदार, चान्नी.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment