रूप बदलणारी पिंगळाई गडावरची पिंगळा देवी:स्वयंभू शक्तिपीठ; दर्शनासाठी देशभरातील भाविकाची गर्दी

रूप बदलणारी पिंगळाई गडावरची पिंगळा देवी:स्वयंभू शक्तिपीठ; दर्शनासाठी देशभरातील भाविकाची गर्दी

पूर्वाभिमुख मोहक चेहरा, तेजस्वी डोळे, उंच कपाळ, त्यावर मधोमध चंद्रकोर व कुमकुम, वस्त्र परिधान केलेले पिंगळा देवीचे रूप पाहून भाविकांच्या चिंता दूर होतात. सकाळी बाल रूप, दुपारी तरुण रूप आणि सायंकाळी वृद्धरूप, असे देवीची तीन रूप दिसतात, असे भाविक सांगतात. नवरात्रीनिमित्त येथील मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत. पिंगळादेवी ही स्वयंभू शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवर पिंगळा देवीचे हे ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिराचा व सभोवतालचा गाभारा हेमाडपंती बांधणीचा आहे. मंदिराच्या समोर दीपस्तंभ आहे. येथे शारदीय व चैत्र नवरात्र साजरा केला जातो. पौष महिन्यात चंडिका महायज्ञ उत्सव साजरा करतात. पिंगळादेवी ही माहूर येथील रेणुका देवीच्या रूपाप्रमाणेच भासणारी देवी आहे. पिंगळादेवी दिवसातून तीन वेळा रूप बदलते, अशी आख्यायिका आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेली पिंगळाई गडावरील पिंगळा देवीच्या मंदिरात नवरात्रनिमित्त दहा दिवसाची पूजा सुरू असून, पिंगळा देवीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची गर्दी होत आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत विश्वस्तांनी अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी होणाऱ्या हरिपाठासह दिवसभर परिसरातील विविध भजनी मंडळांच्या भजनाचे स्वर येथे गुंजत असून ते भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत. मंदिरालगतच कापूर तलाव सुंदर गडावर पिंगळाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावरच कापूर तलाव आहे. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी कापूर तलावावर मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो. हा तलाव नागपूरकर भोसल्यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या तलाव परिसरात एक आगळे-वेगळे वातावरण येणाऱ्या भाविकांना जाणवते.

​पूर्वाभिमुख मोहक चेहरा, तेजस्वी डोळे, उंच कपाळ, त्यावर मधोमध चंद्रकोर व कुमकुम, वस्त्र परिधान केलेले पिंगळा देवीचे रूप पाहून भाविकांच्या चिंता दूर होतात. सकाळी बाल रूप, दुपारी तरुण रूप आणि सायंकाळी वृद्धरूप, असे देवीची तीन रूप दिसतात, असे भाविक सांगतात. नवरात्रीनिमित्त येथील मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत. पिंगळादेवी ही स्वयंभू शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवर पिंगळा देवीचे हे ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिराचा व सभोवतालचा गाभारा हेमाडपंती बांधणीचा आहे. मंदिराच्या समोर दीपस्तंभ आहे. येथे शारदीय व चैत्र नवरात्र साजरा केला जातो. पौष महिन्यात चंडिका महायज्ञ उत्सव साजरा करतात. पिंगळादेवी ही माहूर येथील रेणुका देवीच्या रूपाप्रमाणेच भासणारी देवी आहे. पिंगळादेवी दिवसातून तीन वेळा रूप बदलते, अशी आख्यायिका आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेली पिंगळाई गडावरील पिंगळा देवीच्या मंदिरात नवरात्रनिमित्त दहा दिवसाची पूजा सुरू असून, पिंगळा देवीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची गर्दी होत आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत विश्वस्तांनी अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी होणाऱ्या हरिपाठासह दिवसभर परिसरातील विविध भजनी मंडळांच्या भजनाचे स्वर येथे गुंजत असून ते भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत. मंदिरालगतच कापूर तलाव सुंदर गडावर पिंगळाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावरच कापूर तलाव आहे. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी कापूर तलावावर मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो. हा तलाव नागपूरकर भोसल्यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या तलाव परिसरात एक आगळे-वेगळे वातावरण येणाऱ्या भाविकांना जाणवते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment