माणसे बेमान होतील, पण आमच्या लाडक्या बहिणी होणार नाहीत:शिंदे गटाच्या नेत्याचा विश्वास, विरोधकांवरही साधला निशाणा

माणसे बेमान होतील, पण आमच्या लाडक्या बहिणी होणार नाहीत:शिंदे गटाच्या नेत्याचा विश्वास, विरोधकांवरही साधला निशाणा

आगामी विधानसभा निवडणुकीची काही दिवसांतच होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका करत आहेत, तर सत्ताधारी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. जळगावात नुकत्याचा झालेल्या एका सभेत शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कुणी कितीही लालसा दिली, एक वेळ पुरुष बेईमान होतील, पण आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात गुलाबराव पाटील यांची सभा पार पाडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले. कुणी कितीही लालसा दिली तरी आमच्या बहिणी बेईमान होणार नाहीत. त्या पुन्हा गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांना निवडून देणार आहेत, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जर पुन्हा आमचे सरकार आले, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. निर्णय घेताना महिलांकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांसाठी खूप प्रयत्न करत आहेत. आता मुलगी जन्माला आली की कंटाळा करायचे काम नाही, असे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. योगायोगाने सर्व दाढीवाले वर बसलेले आहेत. नरेंद्र मोदी दाढीवाले, एकनाथ शिंदे दाढीवाले आणि गुलाबराव पाटील सुद्धा दाढीवाला. एखादा निर्णय घेताना महिलांकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केले आहे. गुलाबराव पाटलांनी देवीला घातले साकडे गुलाबराव पाटील यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. अंबे दार उघड आणि आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा गोरगरिबांना हिणवणाऱ्यांचा सत्यानाश कर, असे साकडे त्यांनी देवीला घातले. पुढे बोलताना ते म्हणाले, जीवन छोटेस आहे. गुलाबराव पाटील आज बोलतो उद्या चालला जाईल. मात्र, तुमचे काम करुन गेलो तर तुम्ही कायम लक्षात ठेवाल. आज जे काही बोलत आहे, ते सर्व बहिणींच्या आशीर्वादानेच बोलतो आहे. चांगल्या कामाला वाईट म्हणण्याचा विरोधकांचा धंदा मी लोकांना पंढरपूरला घेऊन गेलो. तुम्ही किमान वणी गडावर किंवा मनुदेवीला तरी न्या. नुसते भाषण करुन चालत नाही तर करुन दाखवावे लागते. स्वत:ला मुलगा झाला तर तो चांगला आणि दुसऱ्याला मुलगा झाला तर तो काळा नकट, अशी विचारसरणी विरोधकांची आहे. प्रत्येक गावात रावण अजून जिवंत आहे. चांगल्या कामाला वाईट म्हणणे हाच विरोधकांचा धंदा आहे, असे म्हणत पाटील यांनी विरोधकांवार निशाणा साधला.

​आगामी विधानसभा निवडणुकीची काही दिवसांतच होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका करत आहेत, तर सत्ताधारी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. जळगावात नुकत्याचा झालेल्या एका सभेत शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कुणी कितीही लालसा दिली, एक वेळ पुरुष बेईमान होतील, पण आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात गुलाबराव पाटील यांची सभा पार पाडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले. कुणी कितीही लालसा दिली तरी आमच्या बहिणी बेईमान होणार नाहीत. त्या पुन्हा गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांना निवडून देणार आहेत, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जर पुन्हा आमचे सरकार आले, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. निर्णय घेताना महिलांकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांसाठी खूप प्रयत्न करत आहेत. आता मुलगी जन्माला आली की कंटाळा करायचे काम नाही, असे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. योगायोगाने सर्व दाढीवाले वर बसलेले आहेत. नरेंद्र मोदी दाढीवाले, एकनाथ शिंदे दाढीवाले आणि गुलाबराव पाटील सुद्धा दाढीवाला. एखादा निर्णय घेताना महिलांकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केले आहे. गुलाबराव पाटलांनी देवीला घातले साकडे गुलाबराव पाटील यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. अंबे दार उघड आणि आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा गोरगरिबांना हिणवणाऱ्यांचा सत्यानाश कर, असे साकडे त्यांनी देवीला घातले. पुढे बोलताना ते म्हणाले, जीवन छोटेस आहे. गुलाबराव पाटील आज बोलतो उद्या चालला जाईल. मात्र, तुमचे काम करुन गेलो तर तुम्ही कायम लक्षात ठेवाल. आज जे काही बोलत आहे, ते सर्व बहिणींच्या आशीर्वादानेच बोलतो आहे. चांगल्या कामाला वाईट म्हणण्याचा विरोधकांचा धंदा मी लोकांना पंढरपूरला घेऊन गेलो. तुम्ही किमान वणी गडावर किंवा मनुदेवीला तरी न्या. नुसते भाषण करुन चालत नाही तर करुन दाखवावे लागते. स्वत:ला मुलगा झाला तर तो चांगला आणि दुसऱ्याला मुलगा झाला तर तो काळा नकट, अशी विचारसरणी विरोधकांची आहे. प्रत्येक गावात रावण अजून जिवंत आहे. चांगल्या कामाला वाईट म्हणणे हाच विरोधकांचा धंदा आहे, असे म्हणत पाटील यांनी विरोधकांवार निशाणा साधला.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment