लातूर, चंद्रपूर, नाशिकमध्ये 10-20टक्के प्रदूषणात घट, देशात 95 शहरांत सुधारणा:2017-18 पासून पातळी कमी झाल्याचे सीपीसीबीच्या अहवालातून समाेर

लातूर, चंद्रपूर, नाशिकमध्ये 10-20टक्के प्रदूषणात घट, देशात 95 शहरांत सुधारणा:2017-18 पासून पातळी कमी झाल्याचे सीपीसीबीच्या अहवालातून समाेर

राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या १३१ शहरांपैकी ९५ शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे. २१ शहरांनी २०१७-१८ च्या पातळीच्या तुलनेत पीएम १० प्रदूषण ४० टक्क्यांवर कमी केले आहे, असा दावा सीपीसीबीच्या अहवालातून करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) म्हणण्यानुसार १३१ राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) शहरांपैकी केवळ १८ शहरे पीएम-१० साठी राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांचे पालन करतात. गुणवत्तेचे मापदंड म्हणून प्रति क्युबिक मीटर ६० मायक्रोग्रॅम असे ठरवले आहे. दिल्ली, हावडा, ठाणे, लातूर, नेल्लोर, गजरौला, अलवर, चित्तूर, काला अंब, मंडी गोबिंदगड, अमरावती, पटियाला, जयपूर, ओंगोले, चंद्रपूर, नाशिक या २१ शहरांमध्ये पीएम-१० प्रदूषणात १०-२० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. देशात २०१९ मध्ये एनसीएपी सुरू केले. त्यानुसार हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण २०-२० टक्क्यांनी कमी करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शनिवारी सुरतला भारतातील प्रमुख शहर म्हणून स्थान देण्यात आले. त्यानंतर जबलपूर आणि आग्रा यांचा क्रमांक लागतो.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छ वायू सर्वेक्षण – २०२४ दरम्यान राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार प्रदान केले. जे जयपूर येथे निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन राष्ट्रीय कार्यशाळेत आयोजित करण्यात आला हाेता. सर्वाेत्कृष्ट शहरांत अमरावती तिसऱ्या स्थानी
दहा लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सुरत, जबलपूर आणि आग्रा या शहरांनी पहिल्या तीन क्रमांकावर, तर फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी (उत्तर प्रदेश) ही तीन ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वोत्तम म्हणून ओळखली गेली.

​राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या १३१ शहरांपैकी ९५ शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे. २१ शहरांनी २०१७-१८ च्या पातळीच्या तुलनेत पीएम १० प्रदूषण ४० टक्क्यांवर कमी केले आहे, असा दावा सीपीसीबीच्या अहवालातून करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) म्हणण्यानुसार १३१ राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) शहरांपैकी केवळ १८ शहरे पीएम-१० साठी राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांचे पालन करतात. गुणवत्तेचे मापदंड म्हणून प्रति क्युबिक मीटर ६० मायक्रोग्रॅम असे ठरवले आहे. दिल्ली, हावडा, ठाणे, लातूर, नेल्लोर, गजरौला, अलवर, चित्तूर, काला अंब, मंडी गोबिंदगड, अमरावती, पटियाला, जयपूर, ओंगोले, चंद्रपूर, नाशिक या २१ शहरांमध्ये पीएम-१० प्रदूषणात १०-२० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. देशात २०१९ मध्ये एनसीएपी सुरू केले. त्यानुसार हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण २०-२० टक्क्यांनी कमी करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शनिवारी सुरतला भारतातील प्रमुख शहर म्हणून स्थान देण्यात आले. त्यानंतर जबलपूर आणि आग्रा यांचा क्रमांक लागतो.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छ वायू सर्वेक्षण – २०२४ दरम्यान राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार प्रदान केले. जे जयपूर येथे निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन राष्ट्रीय कार्यशाळेत आयोजित करण्यात आला हाेता. सर्वाेत्कृष्ट शहरांत अमरावती तिसऱ्या स्थानी
दहा लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सुरत, जबलपूर आणि आग्रा या शहरांनी पहिल्या तीन क्रमांकावर, तर फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी (उत्तर प्रदेश) ही तीन ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वोत्तम म्हणून ओळखली गेली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment