पुन्हा एकदा ‘ठाणे की रिक्षा’:एकनाथ शिंदेंवरील गाण्याला गाण्यानेच प्रत्युत्तर; नवीन गाणे व्हायरल; उद्धव ठाकरेंवरही टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी कलाकार कुणाल कामरा याने बनवलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. एकीकडे याविषयी आता पोलिस आणि न्यायालयात लढाई सुरू झाली असून दुसरीकडे शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाणे सोशल मीडियावर समोर आले आहे. सध्या हे गाणे देखील प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्य शैलीचे कौतुक करण्यात आले असून या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर बनवलेला गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा याने हा व्हिडिओ शूट केला, त्या स्टुडिओमध्ये तोडफोड करत शिवसैनिकांनी या गाण्याचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्या स्टुडिओला समन्स देखील बजावण्यात आले आहे. या संदर्भात कुणाल कामरा विरुद्ध खार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे कुणाल कामरा याने याविषयी माफी मागण्यास साफ शब्दात नकार दिला आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….