नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्याच दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे कोणत्याच मुद्द्यावर चर्चा झाली नाही. मात्र, विधान परिषदेमध्ये बीड येथील हत्येप्रकरणी तसेच विधानसभेमध्ये परभणी येथील घटनेवर विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही मुद्द्यावर सरकारी पक्षाच्या वतीने चर्चेची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आज या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.