प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत साकारणार महाराष्ट्र भवन:मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कराडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभे राहणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने जागा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर आज महाराष्ट्र भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या म्हणजेच भक्त निवासाच्या वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी अप्पर सचिव मनीषा म्हैसकर, अयोध्येचे आमदार, खासदार उपस्थित होते. अयोध्येत महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालकराम मंदिरात प्रभू श्रीराम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतून अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. यावेळी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली. भूमिपूजन झाल्याने आता तेथे भवनचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
260 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन स्थापनेसाठी 2.327 एकर भूखंड दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील पाहुणे, भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी सुमारे 260 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाकडून अयोध्येत राष्ट्रीय महामार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फील्ड टाऊनशिप विकसित केली जात आहे. या जागेवर हा भूखंड उत्तर प्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंडांच्या संपादनासाठी सार्वजनिक विभागाकडून 67.14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आणि इतर सुविधांसाठी अंदाजे 260 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिर सुमारे 7.5 किमी अंतरावर अयोध्येतील प्रस्तावित महाराष्ट्र सदनापासून श्री रामजन्मभूमी मंदिर सुमारे 7.5 किमी अंतरावर आहे. तर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन अयोध्या धाम रेल्वे स्थानकापासून 4.5 किमी अंतरावर बांधले जात आहे. अयोध्येतील नवनिर्मित महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 11 किमी अंतरावर महाराष्ट्र सदन तयार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अयोध्येतील प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केली होती. महाराष्ट्र सदनासाठी 76 कोटी रुपयांची जमीन देण्यात आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रियांका गांधी यांची एन्ट्री:विकासाच्या नावाखाली पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर साधला निशाणा ​​​​​​​ काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीवर आरोप केले आहेत. विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग मुसळधार पावसात कोसळल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेसह अनेक पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर त्यांनी टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक पोस्टमधून केलेल्या टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्ट्रीने ही राज्यातील राजकारणात प्रियांका गांधी यांची एन्ट्री मानली जात आहे. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडीच्या 190 जागा फायनल; 98 जागांवरून चर्चेचा खल:दोन दिवसांत अंतिम निर्णय; दसऱ्यापर्यंत जागावाटप ​​​​​​​ हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. या पार्श्वभूमीवर महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांची सोमवारपासून तीन दिवस अंतिम चर्चेची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. 288 पैकी 190 जागांच्या जागावाटपावर आघाडीत एकमत झाले असून उर्वरित 98 जागांबाबत या तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. पूर्ण बातमी वाचा… ओबीसी आरक्षण संपवण्याचा आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कट:लक्ष्मण हाके यांचा दावा; तर जरांगे स्वतःची गादी निर्माण करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट महाराष्ट्रात रचला गेला आहे. आणि या कटामध्ये महाराष्ट्रातले आजी आणि माजी मुख्यमंत्री सामील असल्याचा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके नांदेड येथे दाखल झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. लक्ष्मण हाके यांची सभा देगलूर ते देखील होणार आहे. पूर्ण बातमी वाचा…. नागपूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी:’एकला चलो’च्या धोरणाची तक्रार श्रेष्ठींकडे करणार, अजित पवारांचे पदाधिकारी आक्रमक नागपूर मधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप विषयाची नाराजी चांगलीच वाढली आहे. या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीत भाजपच्या ‘एकला चलो’च्या धोरणाची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे ठरवण्यात आले. आमचा पक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी भाजपवर पलटवार देखील केला आहे. यामुळे आता नागपूर मध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा….

​कराडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभे राहणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने जागा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर आज महाराष्ट्र भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते या वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या म्हणजेच भक्त निवासाच्या वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी अप्पर सचिव मनीषा म्हैसकर, अयोध्येचे आमदार, खासदार उपस्थित होते. अयोध्येत महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालकराम मंदिरात प्रभू श्रीराम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतून अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. यावेळी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली. भूमिपूजन झाल्याने आता तेथे भवनचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
260 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन स्थापनेसाठी 2.327 एकर भूखंड दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील पाहुणे, भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी सुमारे 260 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाकडून अयोध्येत राष्ट्रीय महामार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फील्ड टाऊनशिप विकसित केली जात आहे. या जागेवर हा भूखंड उत्तर प्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंडांच्या संपादनासाठी सार्वजनिक विभागाकडून 67.14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आणि इतर सुविधांसाठी अंदाजे 260 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिर सुमारे 7.5 किमी अंतरावर अयोध्येतील प्रस्तावित महाराष्ट्र सदनापासून श्री रामजन्मभूमी मंदिर सुमारे 7.5 किमी अंतरावर आहे. तर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन अयोध्या धाम रेल्वे स्थानकापासून 4.5 किमी अंतरावर बांधले जात आहे. अयोध्येतील नवनिर्मित महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 11 किमी अंतरावर महाराष्ट्र सदन तयार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अयोध्येतील प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केली होती. महाराष्ट्र सदनासाठी 76 कोटी रुपयांची जमीन देण्यात आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रियांका गांधी यांची एन्ट्री:विकासाच्या नावाखाली पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर साधला निशाणा ​​​​​​​ काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीवर आरोप केले आहेत. विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग मुसळधार पावसात कोसळल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेसह अनेक पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर त्यांनी टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक पोस्टमधून केलेल्या टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्ट्रीने ही राज्यातील राजकारणात प्रियांका गांधी यांची एन्ट्री मानली जात आहे. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडीच्या 190 जागा फायनल; 98 जागांवरून चर्चेचा खल:दोन दिवसांत अंतिम निर्णय; दसऱ्यापर्यंत जागावाटप ​​​​​​​ हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. या पार्श्वभूमीवर महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांची सोमवारपासून तीन दिवस अंतिम चर्चेची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. 288 पैकी 190 जागांच्या जागावाटपावर आघाडीत एकमत झाले असून उर्वरित 98 जागांबाबत या तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. पूर्ण बातमी वाचा… ओबीसी आरक्षण संपवण्याचा आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कट:लक्ष्मण हाके यांचा दावा; तर जरांगे स्वतःची गादी निर्माण करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट महाराष्ट्रात रचला गेला आहे. आणि या कटामध्ये महाराष्ट्रातले आजी आणि माजी मुख्यमंत्री सामील असल्याचा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके नांदेड येथे दाखल झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. लक्ष्मण हाके यांची सभा देगलूर ते देखील होणार आहे. पूर्ण बातमी वाचा…. नागपूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी:’एकला चलो’च्या धोरणाची तक्रार श्रेष्ठींकडे करणार, अजित पवारांचे पदाधिकारी आक्रमक नागपूर मधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप विषयाची नाराजी चांगलीच वाढली आहे. या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीत भाजपच्या ‘एकला चलो’च्या धोरणाची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे ठरवण्यात आले. आमचा पक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी भाजपवर पलटवार देखील केला आहे. यामुळे आता नागपूर मध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा….  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment