प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज:4-5 दिवसांत निवडणुकीच्या प्रचारात उतरणार
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 3 दिवसांपासून पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी अशा सर्जरी करण्यात आल्या आहेत. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी अस्वस्थ वाटू लागल्याने गुरुवारी पहाटे कुटुंबीयांनी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर अँजिओग्राफी केली. त्यात बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली. बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बाळासाहेबांना एका वेलनेस सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. जिथे ते अँजिओप्लास्टीनंतरची काळजी घेतील आणि बरे होतील. 4-5 दिवसांनी बाळासाहेब पुन्हा विधानसभा निवडणूक प्रचाराला येणार आहेत, असे वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावरून माहिती दिली. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल, अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले. हे ही वाचा… विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींचे आरक्षण थांबवले जाणार:प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक विधान, वंचितच्या बाजूने उभे राहण्याचे केले आवाहन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर हे सध्या पुण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून समाज माध्यमावर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत मोठे विधान केले आहे. पूर्ण बातमी वाचा… प्रकाश आंबेडकरांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य आयसीयूमधून करू नये:त्यांनी प्रकृती सांभाळावी, महाराष्ट्र आम्ही सांभाळतो- संजय राऊत बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे, काळजी आहे.ते या राज्याची नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मला कोणीतरी सांगितले, पण ते सत्त्यावर आधारित नाही. कोणत्या प्रकारचा आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य आयसीयूमधून करू नये, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा…