प्रकाश आवाडे यांनी थेट कंपनीची कुलून तोडून केला प्रवेश:गुंतवणूक व्याजासह परत मिळवण्यासाठी आक्रमक; व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी हुपरी येथील अभिषेक मिल्स मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र गुंतवणुकीचे पैसे त्यांना परत मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अभिषेक मिल्स मध्ये वसुली करण्यासाठी थेट मिलच्या प्रवेशद्वाराची कुलूप तोडून आत प्रवेश केला. या व्हिडिओमध्ये काही कामगार त्यांना अडवत असल्याचे देखील दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अभिषेक मिल्समध्ये प्रकाश आवाडे हे देखील भागीदार आहेत. त्यांनी देखील त्यांनी मिल्समध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, अभिषेक मिल्स संदर्भात काही न्यायालयीन प्रक्रिया आणि कोरोना यामुळे हा प्रकल्प उभा राहू शकला नाही. त्यामुळे आपण केलेली गुंतवणूक ही व्याजासह परत मिळावी यासाठी प्रकाश आवाडे हे मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत आहे. तीन महिन्यांपासून प्रयत्न करुन तसेच वारंवार पाठपुरावा करून देखील गुंतवणूक परत न मिळाल्याने आवाडे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आवाडे यांनी कुलूप तोडून गाडी आत घेण्यास सांगितले आपली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी प्रकाश आवाडे हे कंपनीत गेले असता कंपनीच्या गेटला कुलूप लावून ठेवण्यात आलेले होते. त्यांची गाडी देखील मध्ये जाऊ दिली जात नव्हती. त्यामुळे आक्रमक झालेले प्रकाश आवाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कुलूप तोडून गाडी आत घेण्यास सांगितले. त्यानुसार कुलूप तोडून नंतर गाडी आत घेण्यात आली. यामध्ये काही कामगार देखील आवाडे यांच्याशी बोलताना दिसत आहेत. मात्र, गाडी मध्ये जावू न दिल्यामुळे आक्रमक झालेले प्रकाश आवाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कुलूप तोडून गाडी आत घेण्यास सांगितले. त्यानुसार कुलूप तोडून नंतर गाडी आत घेण्यात आली. यामध्ये काही कामगार देखील आवाडे यांच्याशी बोलताना दिसत आहे. आम्ही स्वतः गेटच्या बाहेर उभे असल्याचे कामगार आवाडे यांना सांगत आहेत.

  

Share