प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का?:त्याला मदत करणारे कोण? काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का?:त्याला मदत करणारे कोण? काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकला तेलंगणा तील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. प्रशांत कोरटकर अटकेसंदर्भात गौप्यस्फोट करत अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली त्यावेळी प्रतिक पडवेकर हा प्रशांत कोरटकर सोबत होता. मग त्यांना का लपवून ठेवले आहे, त्याला का दाखवत नाहीत. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment