समृद्धीचा बाजार:या वर्षी शेअर बाजाराने दिला 40% पर्यंत परतावा, 25% आकारवृद्धी

शेअर बाजारात अलीकडे घसरण झाली तरी गती बिघडण्याची शक्यता कमी आहे. नामांकित जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या मते, भारताच्या समृद्धीची कहाणी दीर्घकालीन भक्कम शक्यतांवर अवलंबून आहे. त्यात घट होण्याची चिन्हे नाहीत. भारताच्या दीर्घकालीन आर्थिक वृद्धीबाबत गुंतवणूकदार सकारात्मक आहेत. वर्षात आतापर्यंत निफ्टी-५० निर्देशांकाने ६५ वेळा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. यापूर्वी २०२१ मध्ये असा वेग ५८ वेळा दिसला होता. या निर्देशांकात दर महिन्याला सरासरी २.३% ची वाढ आहे. हा कल वर्षअखेरीपर्यंत राहिला तर निफ्टी २८ हजारांची पातळी ओलांडू शकतो. सोमवारी हा निर्देशांक २४,७९६ वर बंद झाला. म्हणजे ३ महिन्यांत १३% वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच, निफ्टी या वर्षात आतापर्यंत १२% वर आहे. सेन्सेक्स १४ % वाढला आहे. जानेवारी आणि मे या दोन महिन्यांतच थोडी घसरण झाली. या वर्षी मुंबई शेअर बाजारात कंपन्यांचे बाजारमूल्य ८८ लाख कोटींनी (२५%) वाढले.
१० वर्षांत गुंतवणूक होईल तिप्पट सध्या विविध कारणांमुळे, करेक्शनमुळे बाजारातील मूलभूत गोष्टी, कंपन्याचे उत्पन्न व कामगिरीत बदल झालेला नाही. ही आनंददायी बाब आहे. पण जास्त काळ मार्केटमध्ये राहूनच पैसा कमावता येतो. अल्पकालीन अस्थिरता हा बाजाराचा भाग आहे. बाजारात गुंतवणूक वाढत आहे. ४५१ लाख कोटी (५ ट्रिलियन डाॅलर) बाजार मूल्यात ८५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. २०३० नंतर बाजारमूल्य १००८ लाख कोटी रुपये होईल, त्यानंतर गुंतवणूक २५२ लाख कोटी रुपये होईल. अशा स्थितीत समभाग मोठी संपत्ती निर्माण करणारे ठरतील. या पाच कारणांमुळे भारतीय बाजारात तेजी कायम राहण्याची अपेक्षा १. भारत जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, पुढील ५ वर्षांत विकासाचा वेग ६% पेक्षा जास्त असेल. २०२७ पर्यंत अमेरिका व चीन नंतर ही तिसरी अर्थव्यवस्था असेल. २०३० मध्ये जीडीपी ३.५ ट्रिलियन ते ७ ट्रिलियन डाॅलर असण्याची अपेक्षा आहे. २. उत्पादन आणि निर्यात उद्योग देशामध्ये विकासाची पुढची लाट आणू शकतात. निर्यात वाढल्याने इलेक्ट्रॉनिक उत्पादन, ऊर्जा, इन्फ्रा या क्षेत्रांना फायदा हाेईल. सध्याची निर्यात ६५ लाख कोटी रुपयांची आहे. २०३० पर्यंत ती ८३ लाख कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. ३. तरुण कर्मचारी २०५५-५६ पर्यंत देशाला याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. २०४१ मध्ये ताे सर्वाेच्च स्तरावर असेल. जेव्हा कार्यरत वयाची लोकसंख्या (२०-५९ वर्षे) ५९% असेल. १९९५ पासून मध्यमवर्ग दरवर्षी ६.३% दराने वाढत आहे. तो एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे. ४. लहान गुंतवणूकदारांचा प्रवेश गुंतवणूकदार एसआयपीद्वारे २५० रुपयांची छोटी गुंतवणूक करू शकतील. यामुळे देशांतर्गत बाजारात अतिरिक्त पैसा येईल. सध्या ४५% नाेंदणीकृत कंपन्यांत ५० हजारांपेक्षा जास्त लहान गुंतवणूकदार आहेत. सुमारे ५५ कंपन्यांमध्ये असे १० लाख गुंतवणूकदार आहेत. ५. परकीय गुंतवणुकीत वाढ नाेंदणीकृत कंपन्यांमधील एफआयआयचा हिस्सा सप्टेंबरमध्ये प्रथमच ८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात २७% वृद्धी आहे. तसेच डिसेंबर २०१७ नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. या वर्षी जानेवारीपासून मुंबई शेअर बाजाराच्या २० क्षेत्रीय निर्देशांकाने ५% ते ३९% पर्यंत परतावा दिला आहे. उर्जा क्षेत्राने ३९% परतावा दिला. ऑटोने ३८%, हेल्थकेअरने ३७% आणि युटिलिटीजने ३२% परतावा दिला आहे. भारताने या वर्षी जगभरातील शेअर बाजारांचे नेतृत्व केले. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या मते, एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये भारताचा हिस्सा २०.५% च्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. या प्रगतीमुळे चिनी वर्चस्व संपुष्टात आले. एवढेच नाही तर बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ४५० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्यात अवघ्या चारच वर्षांत १६८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment