धारावीसाठी कुर्ल्यातील जागा देण्यास विरोध:रहिवाशांचा ठिय्या, पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट; वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्लाबोल

धारावीसाठी कुर्ल्यातील जागा देण्यास विरोध:रहिवाशांचा ठिय्या, पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट; वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्लाबोल

धारावी पुनवर्सन प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध होत आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली सरकार धारावीची जागा उद्योगपती गौतम अदानीच्या घशात घालत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. नुकतीच मुलुंडमधील 58 एकर जागा धारावीसाठी देण्यात आली आहे. तर याआधी कुर्ल्यातील मदर डेअरीची काही एकर जागा धारावीसाठी देण्यात आली आहे. मात्र , कुर्ल्यातील ही जागा धारावी प्रकल्पासाठी देण्यास कुर्ला वासियांचा विरोध होत आहे. या अनुषंगाने, आज काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात कुर्ला रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायले मिळाले. राज्य सरकारकडून धारावीचे पुनवर्सन करण्यात येत आहे. उद्योगपती गौतम अदानी यांना हा प्रकल्प दिला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मुलुंड, कुर्ला,अक्सा आणि अन्य ठिकाणच्या जागा नाममात्र दरात धारावी पुनर्विकास प्रकल्पास दिल्या जात आहेत. कुर्ल्यातील मदर डेअरीची काही एकर जागा धारावीसाठी दिली आहे. मात्र, कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पास देण्यास कुर्ल्यातील रहिवाशांचा तीव्र विरोध असून विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी सकाळी नेहरूनगर येथील अभ्युदय बँक येथे मोठ्या संख्येने रस्त्यावर आंदोलन केले. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
जेव्हा जेव्हा अदानी सरकारला प्रश्न विचारला जातो तेव्हा ते पोलिसांच्या मागे लपतात. आज जेव्हा आम्ही मदर डेअरी कुर्ला येथे अदानीकडून भूसंपादन केल्याच्या विरोधात आंदोलन करत आहोत, तेव्हा पुन्हा एकदा पोलिसांचा मोठा फौजफाटा रोखण्यासाठी पाठवण्यात आला आहे. लोक त्यांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. सरकार अदानीसाठी काम करतंय
कुर्ला डेअरी ही कुर्लात आहे, ती शासकिय जमीन आहे. ती जमीन लोकांना मिळावी. ही जमीन कुर्लाकरांची आहे. त्याठिकाणी 150 वर्षांपासूनची झाडे आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू आहे. आमचे एकच म्हणणे आहे की, त्याठिकाणी गार्डन बनवा. लोकांच्या जागा अदानीला देऊन हे सरकार अदानीसाठी काम करत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. पर्यावरण वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, पण पोलिसांनी आम्हाला रोखले. सरकार बड्या उद्योगपतींच्या बाजूने उभे राहून सामान्य नागरिकांचा आवाज दाबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. आपली हिरवीगार फुफ्फुसे आणि आपले पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर ठिय्या
दरम्यान, पोलिसांनी वर्षा गायकवाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली. पोलिसांनी मोर्चा रस्त्यात रोखल्यानंतर वर्षा गायकवाड आणि आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. पुढे जाऊ देणार नाही, तोपर्यंत हा ठिय्या सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment