पुणेकरांना गाजलेले लघुपट पाहण्याची संधी:चौथा ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ 25 सप्टेंबरपासून सुरू

पुणेकरांना गाजलेले लघुपट पाहण्याची संधी:चौथा ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ 25 सप्टेंबरपासून सुरू

बहुचर्चित असलेला चौथा ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ बुधवार दिनांक २५ ते शनिवार दिनांक २८ सप्टेंबर दरम्यान पुण्यातील प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एन एफ डी सी एन एफ ए आय) चित्रपटगृहात होणार आहे. या चार दिवसांच्या महोत्सवात रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात लघुपटांच्या प्रदर्शनाबरोबरच अनेकविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे, अशी माहिती महोत्सव संयोजक व फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव, महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर, प्रमुख सचिव डॉ. विश्वास शेंबेकर, क्रिएटीव्ह हेड अभिषेक अवचार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपस्थित सर्वांच्या हस्ते ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’च्या पोस्टरचे अनावरण करून चारही दिवसांचे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आले.फिल्म फेस्टीवल कंपनी, आशय फिल्म क्लब व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुप्रसिध्द अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापक जसबिर सिंग आणि सुप्रसिध्द संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित रहाणार आहेत. तर महोत्सवाचा समारोप २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महोत्सवातील चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांचा ‘ओपन फोरम’ (मुक्त संवाद) आयोजित करण्यात आला आहे. तर शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘लघुपटांना सापत्न वागणूक का ?’ या विषयावर विशेष परिसंवाद होणार असून यामध्ये समर नखाते, सुनील सुकथनकर, उषा देशपांडे, अक्षय मांडवकर, मयुर कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद नामजोशी करणार आहेत. या महोत्सवासाठी भारताच्या व जगभरातील कानाकोप-यातून सुमारे ८०० लघुपट दाखल झाले त्यापैकी सुमारे ८१ लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात पहाण्याची सुवर्णसंधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.भारतातील बहुसंख्य राज्यांबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा, मेक्सिको, स्विझर्लंड, स्पेन, ग्रीस, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, अमेरीका, लंडन, आर्यलँड, जर्मनी, बेल्जियम, तुर्कस्तान, फिलिपाईन्स, नेदरलँड्स, नेपाळ, पोलंड, सिंगापूर इत्यादी २२ देशांमधून चित्रपट दाखल झाले आहेत. हे लघुपट पहाणे व तेथील संस्कृतीची विशेष ओळख करून घेणे हा अनोखा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे.

​बहुचर्चित असलेला चौथा ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ बुधवार दिनांक २५ ते शनिवार दिनांक २८ सप्टेंबर दरम्यान पुण्यातील प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एन एफ डी सी एन एफ ए आय) चित्रपटगृहात होणार आहे. या चार दिवसांच्या महोत्सवात रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात लघुपटांच्या प्रदर्शनाबरोबरच अनेकविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे, अशी माहिती महोत्सव संयोजक व फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव, महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर, प्रमुख सचिव डॉ. विश्वास शेंबेकर, क्रिएटीव्ह हेड अभिषेक अवचार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपस्थित सर्वांच्या हस्ते ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’च्या पोस्टरचे अनावरण करून चारही दिवसांचे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आले.फिल्म फेस्टीवल कंपनी, आशय फिल्म क्लब व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुप्रसिध्द अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापक जसबिर सिंग आणि सुप्रसिध्द संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित रहाणार आहेत. तर महोत्सवाचा समारोप २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महोत्सवातील चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांचा ‘ओपन फोरम’ (मुक्त संवाद) आयोजित करण्यात आला आहे. तर शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘लघुपटांना सापत्न वागणूक का ?’ या विषयावर विशेष परिसंवाद होणार असून यामध्ये समर नखाते, सुनील सुकथनकर, उषा देशपांडे, अक्षय मांडवकर, मयुर कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद नामजोशी करणार आहेत. या महोत्सवासाठी भारताच्या व जगभरातील कानाकोप-यातून सुमारे ८०० लघुपट दाखल झाले त्यापैकी सुमारे ८१ लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात पहाण्याची सुवर्णसंधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.भारतातील बहुसंख्य राज्यांबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा, मेक्सिको, स्विझर्लंड, स्पेन, ग्रीस, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, अमेरीका, लंडन, आर्यलँड, जर्मनी, बेल्जियम, तुर्कस्तान, फिलिपाईन्स, नेदरलँड्स, नेपाळ, पोलंड, सिंगापूर इत्यादी २२ देशांमधून चित्रपट दाखल झाले आहेत. हे लघुपट पहाणे व तेथील संस्कृतीची विशेष ओळख करून घेणे हा अनोखा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment