पुण्यात थरार:युवासेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेच्या वाहनावर गोळीबार केले की धक्कादायक घटना घडली आहे. वारजे माळवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातंकडून अचानक फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे.निलेश घारे हे घराकडे जात असताना ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. पुणे शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी वारजे माळवाडी येथे गोळीबार केल्याने सदर परिसरात तणाव निर्माण झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घारे यांच्या चारचाकी कारवर मंगळवारी रात्री 12वाजता फायरींग केले .यावेळी घारे हे आपले काम उरकून घराकडे निघाले होते. दरम्यान सहकारींसोबत गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते आले असताना, बाहेर पार्किंग केलेल्या घारे यांच्या काळ्या रंगाच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली.
पूर्ववैमानस्यातून गोळीबार झाल्याचा अंदाज शिवसेनेच्या शिंदे गटाचे घारे युवा सेना जिल्हाप्रमुख असून त्यांच्या वाहनावरच राहत्या घराच्या परिसरात गोळीबार झाल्याने सदर भागात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वारजे पोलिस यांच्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे .याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घारे यांचे कोणाशी यापूर्वी वाद आहे का किंवा पूर्ववैमानस्यातून सदरचा प्रकार केला आहे का याबाबत देखील पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.