पुण्यातील नवले ब्रिजवर आपघातांचे सत्र:मद्यधुंद तरुणाने भरधाव चालवली मर्सिडिज, कीर्तन करून परतणाऱ्या तरुणाचा घेतला जीव

पुण्यातील नवले ब्रिज हा अपघातांचा पूल म्हटला जात आहे. या ब्रिजवर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. तीन वेगवेगळ्या प्रकरणात अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यातील एका प्रकरणात तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली व निरपराध तरुणाचा यात जीव गेला आहे. शनिवारी पहाटे 3.30 वाजता हा अपघात झाला. शुभम भोसले हा महाविद्यालयीन तरुण दारूच्या नशेत मर्सिडिज कार चालवत होता. यावेळी त्याच्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा जीव गेला आहे. हिंजवडी परिसरात शुभम भोसले व त्याचे मित्र निखिल रानडे, श्रेयस सोळंखी आणि वेदांत इंद्रसिंग राजपूत या चौघांनी दारूची पार्टी केली होती. त्यानंतर हे बंगळुरू महामार्गावरून कात्रज बोगद्याच्या दिशेने जात होते. परत येत असताना वडगाव पुलावर त्यांनी किर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी निघालेल्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामधे कुणाल हुशारचा मृत्यू झाला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव उड्डाणपुलावर ब्रेक फेल ट्रकचा थैमान:दोन दिवसांत दोन वेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू, पाच वाहनांचे नुकसान वडगाव उड्डाणपुलावर शनिवारी भरधाव ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनाना धडक देत एकाला ट्रक खाली चिरडण्याचा प्रकार घडला आहे. तर, शुक्रवारी पादचाऱ्याचा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण पावनोजी गावडे-पाटील ( ३६, रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर,पुणे ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण हे उड्डाणपुलावरुन गाडीवरून जात होते. त्यावेळी भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे पुढील तपास करत आहेत. हेही वाचा