कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहणार:पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार‎

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहणार:पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार‎

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास आपले प्राधान्य राहणार आहे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले. पोलिस आयुक्त चावरिया यांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रभारी पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. पुणे येथे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत असलेले अरविंद चावरिया यांची चार दिवसांपूर्वी अमरावती पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी ते शहरात दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी आयुक्तालय गाठले व पदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, नुकताच पदभार घेतला आहे. शहराबद्दल परिपूर्ण माहिती घेऊ, त्यानंतर कामाची सविस्तर रूपरेषा ठरवण्यात येईल. मात्र कायदा {उर्वरित. पान ४ प्रभारी पोलिस आयुक्त शिंदे यांच्याकडून पदभार घेतना पोलिस आयुक्त चावरिया.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment