प्रश्न तुमचे अन् उत्तरे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांची:सरकार कुणाचे येऊ द्या, आरक्षण घेणारच – जरांगे; ओबीसी आरक्षणात वाटा मागणे दुटप्पीपणा-हाके
समाज एकत्र आल्याशिवाय ओबीसी सीएम होणार नाही मराठा समाज ओबीसींविरोधात कधी नव्हताच. तुमच्या आंदोलनाने या दोन समाजात द्वेष निर्माण झाला आहे का ?
– नानासाहेब पवार, छत्रपती संभाजीनगर लक्ष्मण हाके : एकीकडे ओबीसींना विरोध नाही म्हणायचे अन् दुसरीकडे त्यांचे आरक्षण मागायचे हा विरोधाभास नाही का? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले तर मग ओबीसींचे काय होईल याची कल्पना आहे का? ओबीसी मुख्यमंत्री मिळेल का?
– एक वाचक
हाके : राज्यात ५० ते ६० % ओबीसी आहेत. हा समाज जेव्हा एकत्र येईल त्या दिवशी राज्यात ओबीसींशिवाय दुसरा मुख्यमंत्रीच होणार नाही. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्यांना पदे देऊन सरकारने शांत केले. तुम्ही त्याच मार्गाने जाणार आहात काय?
– अतुल शिंगाडे
हाके : धनगरांना ओबीसीत ३ % आरक्षण आहे. शिक्षण, नोकऱ्यात त्यांना लाभ होतोय. त्यांना एसटीतून कधी आरक्षण मिळेल सांगता येत नाही. पण एनटींचे आरक्षण वाचवण्यासाठी हाकेने पुढाकार घेतला तर त्यात वावगे काय? ओबीसीतून २७ % आरक्षणासाठी लढा सुरूच राहील तुम्ही फक्त फडणवीस यांच्यावरच टीका करता, त्यासाठी शरद पवारांनी काही आश्वासन दिले आहे का? – एक वाचक
मनोज जरांगे : ते तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा. जरांगे यांची नेमकी मागणी काय आहे, ती त्यांना तरी समजली आहे का? – बापूराव पाटील
मनोज जरांगे : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी आहे. मराठा समाज ओबीसीतच आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे ५० टक्क्यांच्या आतील २७ टक्के आरक्षण माझ्या समाजाला मिळावे हीच माझी मागणी आहे. यात कोणताही किंतु-परंतु नाहीच. मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल. आताचे विरोधक सत्तेत आले तर ते तरी देऊ शकतील का? – एक वाचक
मनोज जरांगे : गैरसमजातून बाहेर पडा. आपल्याला आरक्षण घ्यायचेच आहे. कोणतेही सरकार आले तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आमचा लढा थांबवणार नाहीच.