रब्बीच्या पिकावर रानडुकरांचा ताव; शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान:टाकरखेडा संभू परिसरात हैदोस; शेतकरी त्रस्त, पेरलेला हरभरा उलटवला‎

रब्बीच्या पिकावर रानडुकरांचा ताव; शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान:टाकरखेडा संभू परिसरात हैदोस; शेतकरी त्रस्त, पेरलेला हरभरा उलटवला‎

परिसरातील शेतकरी खरिपाच्या पिकानंतर आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे. बऱ्याच ठिकाणी रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. परंतु, पेरणी केलेल्या रब्बीच्या हरभऱ्यावर रानडुकरांनी ताव मारणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. टाकरखेडा संभू परिसरात रानडुकराच्या हैदोसामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे. खरीप हंगामामध्ये आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झालेली आहे. अशातच आता रब्बी हंगामांवर शेतकऱ्यांच्या नजर लागून आले. रब्बी हंगाम तरी पदरात समाधानकारक पिक टाकेल या आशेवर परिसरातील शेतकरी हरभऱ्याची पेरणी करीत आहेत. मात्र सुरुवातीपासून रानडुक्कर त्यावर पाणी फेरत असल्याने खरीप हंगामाने गारद झालेला शेतकरी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाने हवालदिल झाला आहे. मोठ्या जोमाने शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला सुरूवात केली आहे. मात्र, आता शेत शिवारात रानडुकराच्या हैदोसाचे नवीन संकट निर्माण झाले आहे. टाकरखेडा संभू परिसरात जवळपास ५० टक्क्यांच्या वर हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे. परंतु, रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच हैराण झालेला आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच हरभऱ्याची पेरणी केली. परंतु, संपुर्ण पेरलेला हरभरा रानडुकरांनी फस्त केला असून या गंभीर बाबीकडे वनविभागाने लक्ष देऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. चार एकरातील हरभरा रानडुकराने पलटवला सहा एकरात कपाशी लावली आहे. रोहींमुळे तिचे नुकसान होत आहे. उर्वरित चार एकरात ८ नोव्हेंबर रोजी हरभऱ्याची पेरणी केली. मात्र दोनच दिवसात रानडुकरांनी तो माडून काढला. चार एकरातील पेरणीसाठी आतापर्यंत मला २५ हजार रुपये खर्च आला. आता पुन्हा पेरणी करावी लागणार असल्याने आर्थिक संकट पुढे उभे ठाकले आहे. उदरनिर्वाहच शेतीवर असल्याने काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रीया शेतकरी संजय पिंगळे यांनी दिली आहे. रानडुकरांसह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरात रानडुकरांसह रोही व अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच हवालदिल आहे. अशात वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाचा त्यांना सामना करावा लागत असल्याने वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment