राहात्यात डेअरीत घुसले दोन बिबटे:श्वानाने वाचवले रखवालदाराचे प्राण; परिसरात घातला धुमाकूळ

राहात्यात डेअरीत घुसले दोन बिबटे:श्वानाने वाचवले रखवालदाराचे प्राण; परिसरात घातला धुमाकूळ

प्रतिनिधी | राहाता येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरातील सुनील शांताराम सदाफळ यांच्या पंचकृष्णा डेअरीच्या प्रांगणात बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश करून डेअरीच्या लॅबमध्ये भांडण करून धुमाकुळ घालून लॅब साहित्याची मोठे नुकसान केले. यापूर्वी गेटजवळ राखण करणाऱ्या राखणदारावर बिबट्याने हल्ला करण्यापूर्वीच श्वानाने रखवालदाराजवळ भुंकत जाऊन त्याला जागे केले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रसंगातून रखवालदाराचे प्राण या श्वानाने वाचवले. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन बिबट्यांनी पंचकृष्णा डेअरीत प्रवेश केला. गेटवर असलेला रखवालदार झोपेत असल्याने त्याच्याकडे जाणाऱ्या बिबट्यास पाहून तेथे असलेल्या कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे रखवालदारास जाग आली. बिबट्यास पाहून भयभीत रखलदराने बिबट्याला हुसकाण्याचा प्रयत्न केला. बिबट्यांनी यावेळी जवळच असलेल्या लॅबमध्ये प्रवेश केला. परंतु दरवाजा बंद झाल्यामुळे बिथरलेल्या बिबट्यांनी आतमध्ये दूध तपासणीच्या प्रयोगशाळा साहित्याचे नुकसान केले. बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्यामुळे कार्यालयाच्या काचेला धडक देत काचा फोडून बिबटे बाहेर पळाले. राहाता येथील पंचकृष्ण डेअरीमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment