राहुल गांधी कोणाच्या बापाला घाबरत नाहीत:कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधी कोणाच्या बापाला घाबरत नाहीत:कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणसंदर्भातील वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे संजय गायकवाड तसेच आता भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वादग्रस्त टीका केली आहे. यावर कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. या देशात लोकशाही आहे का? विजय वडेट्टीवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. यासोबत शिंदे गटाचा आमदार सुद्धा राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री राहुल गांधींना अतिरेकी नंबर एक म्हणतात, पंजाबचे आमदार राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देतात. देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला अशा प्रकारे जीवंत मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई होत नसेल तर या देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते राहुल गांधींना घाबरले आहेत विजय वडेट्टीवार म्हणाले, राहुल गांधी कोणाच्या बापाला त्यांच्या गिधाड धमक्यांना घाबरणारे नाहीत. कारण या कुटुंबाचा बलिदान आणि त्यागाचा इतिहास आहे. या देशासाठी स्व. इंदिरा गांधी शहीद झाल्या. या देशात राहुल गांधींचे वडील स्व. राजीव गांधी शहीद झाले. त्यांचे पणजोबा या देशाच्या स्वतंत्र्यासाठी 13 वर्ष तुरुंगात राहिले. हा स्वातंत्र्याचा इतिहास, त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास गांधी कुटुंबाच्या मागे आहे. चार हजार किमीचा प्रवास करून या देशातील माणसाला जोडण्याचे काम नफरत संपवण्याचे काम राहुल गांधींनी केल्यानंतर भाजप पक्षाला भीती वाटायला लागली आहे. ते राहुल गांधींना घाबरले आहेत आणि घाबरून अशा प्रकारच्या गिधाड धमक्या हे नेते देत आहेत. जनता तुम्हाला रस्त्यावर ठेचेल विजय वडेट्टीवार म्हणाले, आपण अवकातीमध्ये राहून असे बोलले पाहिजे आणि अवकात विसराल तर जनता तुम्हाला रस्त्यावर ठेचेल, हेही तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. पंतप्रधान म्हणून तसेच केंद्राचे गृहमंत्री म्हणून तरी देशाच्या विरोधीपक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही चुप्पी साधून आहेत. का कारवाई करत नाहीत? लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई व्हायला की नको? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी दिले पाहिजे आणि त्वरित यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, अन्यथा अशा नालायक लोकांना, अशा हरामखोर प्रवृत्तींना धडा शिकवायला आम्हाला वेळ लागणार नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

​लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणसंदर्भातील वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे संजय गायकवाड तसेच आता भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वादग्रस्त टीका केली आहे. यावर कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. या देशात लोकशाही आहे का? विजय वडेट्टीवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. यासोबत शिंदे गटाचा आमदार सुद्धा राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री राहुल गांधींना अतिरेकी नंबर एक म्हणतात, पंजाबचे आमदार राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देतात. देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला अशा प्रकारे जीवंत मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई होत नसेल तर या देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते राहुल गांधींना घाबरले आहेत विजय वडेट्टीवार म्हणाले, राहुल गांधी कोणाच्या बापाला त्यांच्या गिधाड धमक्यांना घाबरणारे नाहीत. कारण या कुटुंबाचा बलिदान आणि त्यागाचा इतिहास आहे. या देशासाठी स्व. इंदिरा गांधी शहीद झाल्या. या देशात राहुल गांधींचे वडील स्व. राजीव गांधी शहीद झाले. त्यांचे पणजोबा या देशाच्या स्वतंत्र्यासाठी 13 वर्ष तुरुंगात राहिले. हा स्वातंत्र्याचा इतिहास, त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास गांधी कुटुंबाच्या मागे आहे. चार हजार किमीचा प्रवास करून या देशातील माणसाला जोडण्याचे काम नफरत संपवण्याचे काम राहुल गांधींनी केल्यानंतर भाजप पक्षाला भीती वाटायला लागली आहे. ते राहुल गांधींना घाबरले आहेत आणि घाबरून अशा प्रकारच्या गिधाड धमक्या हे नेते देत आहेत. जनता तुम्हाला रस्त्यावर ठेचेल विजय वडेट्टीवार म्हणाले, आपण अवकातीमध्ये राहून असे बोलले पाहिजे आणि अवकात विसराल तर जनता तुम्हाला रस्त्यावर ठेचेल, हेही तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. पंतप्रधान म्हणून तसेच केंद्राचे गृहमंत्री म्हणून तरी देशाच्या विरोधीपक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही चुप्पी साधून आहेत. का कारवाई करत नाहीत? लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई व्हायला की नको? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी दिले पाहिजे आणि त्वरित यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, अन्यथा अशा नालायक लोकांना, अशा हरामखोर प्रवृत्तींना धडा शिकवायला आम्हाला वेळ लागणार नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment