रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीत भीषण स्फोट:तीन कामगारांचा मृत्यू तर तिघांची प्रकृती गंभीर

रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीत भीषण स्फोट:तीन कामगारांचा मृत्यू तर तिघांची प्रकृती गंभीर

रायगड येथील धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा स्फोट धाटाव एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीत झाला असून या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर पर्यंत याचा आवाज ऐकू असल्याचे स्थानिकांकडून समजते. या स्फोटामुळे धाटाव एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धाटाव येथील एमआयडीसी परिसरात झालेल्या या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी झालेल्या ढीगरा उपसून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. साधना नायट्रो नामक कंपनीत हा स्फोट झाला असल्याचे समोर आले आहे. हा स्फोट सकाळी 11 च्या सुमारास झाला होता. धाटाव एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक 47 येथील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत हा स्फोट झाला आहे. कंपनीतील ओबीडी2 केमिकल प्लांटमध्ये ओबीडी2 प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथनॉल केमिकलच्या स्टोरेज टॅंकवर फॅब्रिकेटर्सचे ६ कामगार वेल्डिंगचं काम करत होते. ते कामगार वेल्डिंगचं काम करत असताना मिथेनॉल केमिकल टॅंकचा ब्लास्ट होऊन त्यात हे सहा कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल, रोहा येथे हलविण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच येथील आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनीला भेट दिली. त्याचबरोबर तिथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या सेफ्टी विषयी माहिती घेतली आणि त्यानंतर त्वरित रुग्णालयात जाऊन तिघे गंभीर जखमी असलेल्यांची विचारपूस करून त्यातील अतिगंभीर असलेल्या एकाला त्वरित मुंबईच्या बर्नल हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास मुपडे करत आहेत. गेल्यावर्षी 7 कामगार ठार दरम्यान, यापूर्वी देखील या एमआयडीसीमध्ये विविध कंपन्यांना आग लागणे तसेच स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असूनही येथील कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. गेल्यावर्षी महाड एमआयडीसी येथील ब्ल्यु जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत मोठा स्फोट झाला होता, यात सात कामगार ठार झाले होते.

​रायगड येथील धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा स्फोट धाटाव एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीत झाला असून या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर पर्यंत याचा आवाज ऐकू असल्याचे स्थानिकांकडून समजते. या स्फोटामुळे धाटाव एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धाटाव येथील एमआयडीसी परिसरात झालेल्या या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी झालेल्या ढीगरा उपसून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. साधना नायट्रो नामक कंपनीत हा स्फोट झाला असल्याचे समोर आले आहे. हा स्फोट सकाळी 11 च्या सुमारास झाला होता. धाटाव एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक 47 येथील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत हा स्फोट झाला आहे. कंपनीतील ओबीडी2 केमिकल प्लांटमध्ये ओबीडी2 प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथनॉल केमिकलच्या स्टोरेज टॅंकवर फॅब्रिकेटर्सचे ६ कामगार वेल्डिंगचं काम करत होते. ते कामगार वेल्डिंगचं काम करत असताना मिथेनॉल केमिकल टॅंकचा ब्लास्ट होऊन त्यात हे सहा कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल, रोहा येथे हलविण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच येथील आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनीला भेट दिली. त्याचबरोबर तिथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या सेफ्टी विषयी माहिती घेतली आणि त्यानंतर त्वरित रुग्णालयात जाऊन तिघे गंभीर जखमी असलेल्यांची विचारपूस करून त्यातील अतिगंभीर असलेल्या एकाला त्वरित मुंबईच्या बर्नल हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास मुपडे करत आहेत. गेल्यावर्षी 7 कामगार ठार दरम्यान, यापूर्वी देखील या एमआयडीसीमध्ये विविध कंपन्यांना आग लागणे तसेच स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असूनही येथील कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. गेल्यावर्षी महाड एमआयडीसी येथील ब्ल्यु जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत मोठा स्फोट झाला होता, यात सात कामगार ठार झाले होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment