राज ठाकरे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात:पण ते पटत नसल्याने जनतेचे मोदींनाच प्रचंड समर्थन, भाजप नेते आशिष शेलारांचा पलटवार

राज ठाकरे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात:पण ते पटत नसल्याने जनतेचे मोदींनाच प्रचंड समर्थन, भाजप नेते आशिष शेलारांचा पलटवार

भारतीय जनता पक्षाने तडजोडीचे राजकारण कधीच केले नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण या आधारावर राजकारण करताना आम्ही कधीच तडजोड केली नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात जो एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. असा पलटवार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार म्हणाले, अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. काश्मीर मधून 370 कलम अ काढताना ‘एक देश, एक निशान, एक संविधान’ हीच भूमिका आम्ही मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात एकदा लागलंच पाहिजे, या भूमिकेत आम्ही तडजोड केली नाही. ‘पोखरण’ असो वा एन.आर.सी, सी.ए.ए च्या विषयावर सुद्धा भाजपने कधीच तडजोड केली नाही. अंत्योदय आणि गरिब कल्याणाच्या ज्या भूमिका आणि योजना हाती घेतल्या त्यात तडजोड केली नाही. सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए। अशी बाणेदार भूमिका पण आम्ही प्रसंगी घेतली. आशिष शेलारांचा राज ठाकरेंना मैत्रीचा सल्ला
आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले, तडजोडीविना राजकारण करताना राष्ट्रहित प्रथम करताना, त्या राजकीय प्रवासात स्थळ, काळ, वेळ आवश्यकतेनुसार जे घडले, त्यातून तुम्ही जो नॅरेटिव्ह पसरवू पाहत आहात, ते जनतेला अमान्य आहे. म्हणूनच भाजप आणि मोदींना मिळणारे समर्थन आणि मतदान कालानुरूप वाढत आहे. कारण तत्त्वाशी, राष्ट्र विचारांशी कधीच तडजोड केली नाही. प्रवासात जे घडले, ते राष्ट्र हितासाठी. याच भूमिका घेऊन आम्ही चाललो. यात काही शिकण्यासारखे तर नक्कीच आपण बघा, असा सल्ला देखील आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना दिला. काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे कायम भूमिका बदलतात, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जात होता. जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने किती वेळा भूमिका बदलली, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या पुलोद सोबत देखील सरकार स्थापन केले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील अमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या नावाचा देखील राज ठाकरे यांनी उल्लेख केला. तेव्हापासून आजपर्यंत अशोक चव्हाण, विखे पाटील, अजित पवार असे अनेकांची नावे राज ठाकरे यांनी यावेळी घेतली. ज्यांच्यावर आरोप होतो, ते नंतर भाजपसोबत येतात, असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे. या वेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचा देखील उल्लेख केला. हे ही वाचा… भूमिका बदलण्याच्या आरोपाचा राज ठाकरेंकडून समाचार:भाजपच्या भूमिकांची जंत्रीच वाचली; मनपा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे कायम भूमिका बदलतात, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जात होता. या आरोपाचा समाचार राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला. पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष यांनी किती वेळा भूमिका बदलली याबाबत राज ठाकरे यांनी पाढाच वाचला. जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने किती वेळा भूमिका बदलली, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment