राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर चांगलेच:ठाकरेंच्या नेत्यानेही केले स्वागत; ‘राज्याच्या हितासाठी मराठी माणूस एकत्र येणे आवश्यक’

लबाड लोक लचके तोडत असताना त्यांचे घराघरात भांडणे लावण्याचे काम आहे. शरद पवार यांचे घर फोडण्यासारखी इंग्रजांची नीती आताच्या शासनाची आहे. या शक्ती विरोधात लढ्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. लोकं एकत्र येण्याची चर्चा करत असतात, तरी एकत्र येण्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे घेतील, असे मत उद्धव ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा हा विषय नेहमी चर्चेत येत असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत. मात्र, राजकीय विषय स्वतंत्र आहे, हे वेगळे विषय आहेत. तरीही राज ठाकरे एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे. उद्धव ठाकरे हे एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. ते त्याचा निर्णय घेतील, असे देखील दानवे यांनी म्हटले आहे. शिवसेना लढत असताना राज ठाकरे यांनी आतापर्यंत कोणाला मदत केली, याची सर्वांना माहिती आहे. त्यांनी अशा भूमिका घेतलेल्या असताना शंका येणे मुलभूत असल्याचेही दानवे यांनी सांगितले. दोघेही ठाकरे सक्षम आहेत. त्यामुळे दोघे काय करायचे ते ठरवतील, असे देखील दानवे यांनी म्हटले आहे. चॅनलवर प्रस्ताव ठेवून युतीचे काम होत नसल्याचा टोला शिवसेनेत पक्षप्रमुख अंतिम असतात. मात्र, चॅनलवर प्रस्ताव ठेवून युतीचे काम होत नसल्याचा टोला देखील अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. शिवसेनेची काँग्रेस सोबत बरेच वर्षे लढण्यात गेली. माझ्या आयुष्यातली बरीच वर्षे काँग्रेस सोबत लढण्यात गेले आहेत. पक्षप्रमुख यांच्या भूमिका आमच्यासाठी जीव की प्राण असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे. तरी देखील मराठी माणूस एकत्र येण्यास काहीच हरकत नाही. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका कधी होईल, हे माहिती नाही. राज्याच्या हितासाठी मराठी माणूस एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मांडलिकत्व पत्करण्यासाठी प्रतिसाद कसा द्यावा? – सुषमा अंधारे मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचे हितसंबंध पायदळी तुडवणाऱ्या भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकायची तयारी आहे का? हा प्रश्न मांजरेकरांनी ठामपणे विचारणे अपेक्षित होते. स्वतंत्र मराठी अस्मितेसाठी निश्चित सकारात्मक विचार होऊ शकतो. मात्र भाजपचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी प्रतिसाद कसा द्यावा? असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.