राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार?:पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल

राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार?:पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल

जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरहून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या/आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात. पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदनाचा फोटो देखील त्यांचे एक्स’वर शेअर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे फरार झाले आहेत. त्यांच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने मुलाला घेऊन पलायन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सासरा आणि दीर फरार झाले आहेत. वैष्णवी हगवणेची ऑडिओ क्लिप व्हायरल वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. (दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही). या ऑडिओ क्लिपमध्ये वैषणवीने तिला होणारा त्रास याबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगितले आहे. “लग्न करून चूक केली. मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केले नाही ते सगळे सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असे मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असे म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत म्हणत होती”. पुढे वैष्णवी म्हणते की, “मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीपण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरे वाटले आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितले आहे. आपण त्यावर विचार करू, असे मला पप्पांनी सांगितले आहे. मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांचे तर तसेच वागणे असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केले. इथेच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळे बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेले आहे. ही छोटी गोष्ट आहे, असे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. हुंड्यात घेतले 51 तोळे सोनं अन् फॉर्च्युनर मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाच्यावेळी तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरचे लोकं तिचा छळ करत होते. तर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, या सर्व गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने घेतला होता चारित्र्यावर संशय वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) मुळशी तालुक्यातील भुकूमची होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, वैष्णवीचा सासरच्या कुटुंबाने अमानुष छळ केला. तिच्यावर मानसिक अत्याचार करण्यात आला. ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असलेल्या वैष्णवीने पती शशांकला या बाबत माहिती दिली असता, त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ‘हे बाळ माझे नाही, दुसऱ्या कोणाचे असावे’ असे म्हटले. यावरून पती शशांक आणि सासरचे लोकांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, शशांकने तिला मारहाण केली. शिवीगाळ करत घरातून हाकलून देईन असे धमकावत तिला घरातून बाहेर काढले. हेही वाचा

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment