राम मंदिराच्या शिखराचे काम अंतिम टप्प्यात, 20 जूनपर्यंत प्राणप्रतिष्ठा…:वास्तुविशारद सोमपुरा म्हणाले, राम दरबारात 10 हून जास्त मूर्ती स्थापणार

आज संपूर्ण देशात रामनवमी साजरी होत आहे. यादरम्यान, अयोध्येत राम मंदिर शिखराचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर राम दरबाराचे काम पूर्ण झाले आहे. येथे संगमरवरी १० हून जास्त मूर्ती स्थापित होतील. यामुळे भक्तांना वाटेल की, साक्षात भगवान रामाच्या दरबारात आलो आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राम मंदिराची पूर्णपणे तयारी हाेईल होईल. अयोध्येत तयार होणाऱ्या राम मंदिराचे वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी प्राण प्रतिष्ठेवेळेपर्यंत ग्राउंड फ्लोअर तयार झाले होते. यानंतर दीड वर्षांत मंदिराचा दुसरा आणि तिसरा मजला, घुमट आणि शिखराचे ८०% हून जास्त काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल. याच पद्धतीने जूनपर्यंत पूर्ण मंदिर तयार होईल. यानंतर प्राण प्रतिष्ठा ट्रस्टद्वारे प्रतिष्ठापना केली जाईल. कॉरिडॉरमध्ये महादेव, गणेश आणि अंबाजीची मंदिरेही असतील. सोमपुरांच्या अंदाजानुसार, २० ते ३० जूनदरम्यान मंदिराची पूर्ण प्राण-प्रतिष्ठा केली जाईल. सूर्यतिलकची चाचणी यशस्वी, आजयेतील ५० लाख भाविक येणार शनिवारी राममंदिराच्या गर्भगृहात सूर्यतिलकाची चाचणी केली. दिवसा १२.०० वाजता तिलक चाचणी केली. ८ मिनिटांपर्यंत सूयतिलकची चाचणी चालली. रामलल्लाच्या गर्भगृहात ३ मिनिटांपर्यंत पडदा लावला. या वर्षी जन्मोत्सवादरम्यान सुमारे ५० लाख भाविक अयोध्येत पोहोचू शकतात. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. चैत्र रामनवमी पाहता डीजीपी प्रशांतकुमार यांनी मंदिरांच्या मुख्य द्वारावर ॲक्सेस कंट्रोलचे निर्देश दिले. ४-५ फूट उंच असतील मूर्ती सोमपुरा म्हणाले, दुसऱ्या मजल्यावर राम दरबार बनवला आहे. तेथे भगवान श्रीराम, माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानाच्या मूर्त्या स्थापन केल्या जातील. या मूर्त्या जयपूरमध्ये घडवल्या जात आहेत. या सर्व मूर्त्या १५ एप्रिलपर्यंत अयोध्येत पोहोचतील. त्या पांढऱ्या दगडापासून तयार होतील आणि एवढ्या जीवंत असतील की, भाविकांना साक्षत प्रभू श्रीरामाच्या दरबारात आल्यासारखे वाटेल. राम-दरबारात प्रत्येक मूर्तीची उंची ४ ते ५ फुटादरम्यान ठेवली आहे. ४५० खांब, प्रत्येकावर १६ मूर्ती सोमपुरा यांनी सांगितले की, राम दरबारात बन्सीपहाडपूरच्या दगडाचा वापर केला आहे. फ्लोरिंगमध्ये मकरानाचे संगमरवर आहे. प्रत्येक खांबावर सुमारे १६-१६ मूर्ती कोरल्या आहेत आणि असे एकूण ४५० खांब आहेत. त्यांच्यावर दिशांच्या दिग्पालांची मूर्ती साकारली आहे. राम दरबारापर्यंत कसे पोहोचाल? राममंदिराच्या गर्भगृहात रामाच्या बाल स्वरूप दर्शनानंतर येथे भक्त दुसऱ्या मजल्यावर राम दरबारातच्या दर्शनास जाऊ शकतील. त्यासाठी १४ ते १६ फूट रुंद पायऱ्या आहेत. दिव्यांग भाविकांसाठी मागच्या बाजूने एक लिफ्टही बनवली आहे. मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर मूर्ती स्थापित नाही.हा मजला गुजरातच्या वेरावलच्या साेमनाथ मंदिराप्रमाणे आहे.