राम सातपुतेंचा धैर्यशील मोहिते पटलांवर जोरदार हल्लाबोल:म्हणाले- चिखलात माखलेल्या हाल्या लोकसभा निवडणुकीत केवळ अवकाळी पावसाने धुवून निघाला

राम सातपुतेंचा धैर्यशील मोहिते पटलांवर जोरदार हल्लाबोल:म्हणाले- चिखलात माखलेल्या हाल्या लोकसभा निवडणुकीत केवळ अवकाळी पावसाने धुवून निघाला

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या भाषणात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका कली आहे. चिखलात माखलेल्या हाल्या लोकसभा निवडणुकीत केवळ अवकाळी पावसाने धुवून निघाला आहे, असे म्हणत मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार नारायण पाटील व अजित पवार गटाकडून माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात लढत होणार आहे. यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार नारायण पाटील यांच्या बाजूने प्रचार सुरू केला असून संजय मामा शिंदे यांच्या मदतीला राम सातपुते आले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील व सातपुते यांच्यात प्रचारादरम्यान जोरदार शाब्दिक चकमकी घडताना दिसून आल्या. राम सातपुते यांना लोकसभा तसेच विधानसभेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यात मोहिते पाटलांची भूमिका महत्त्वाची होती. मोहिते पाटलांनी लोकसभेत कॉंग्रेसचे प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तसेच उत्तम जानकर यांनी लोकसभेत दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून विधानसभेतही त्यांना मदत करण्यात आली. परिणामी राम सातपुते यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत माढ्यातून रणजित शिंदे आणि करमाळा येथे संजय शिंदे या काका पुतण्यांना परभवा सोसावा लागला होता. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे संजय शिंदे हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment