ते संघाचे सरसंघचालक असू शकतात, हिंदू धर्माचे नाही:मोहन भागवतांच्या मशिदीच्या वक्तव्यानंतर रामभद्राचार्य नाराज

ते संघाचे सरसंघचालक असू शकतात, हिंदू धर्माचे नाही:मोहन भागवतांच्या मशिदीच्या वक्तव्यानंतर रामभद्राचार्य नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान असू शकते. ते संघाचे सरसंघचालक असू शकतात, हिंदू धर्माचे नाही, असे स्वामी रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. स्वामी रामभद्राचार्य पुढे बोलताना म्हणाले की, त्यांचे हे विधान वैयक्तिक असू शकते, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, कारण ते आमचे प्रमुख नाहीत. ते संघाचे संचालक असू शकतात, हिंदू धर्माचे नाही. आमचे लक्ष नेहमीच शिस्त आणि सत्यावर असते. जिथे-जिते हिंदू धर्माची प्रमाणित स्थळे असतील तेथे आमची उपस्थिती असेल. मंदिर पुनर्स्थापनेचा प्रयत्न करणार स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, जिथे पुरातन मंदिराचे पुरावे उपलब्ध आहेत, तेथे आम्ही त्यांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करु. ही आमच्यासाठी नवीन कल्पना नसून, सत्याच्या आधारे आपली संस्कृती आणि धर्माचे जतन करणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेल्या हिंसाचारात लोकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदूंनी संघटीत व्हावे, त्याते ध्रुवीकरण होऊ नये, असेही ते म्हणाले आहे. बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारावर कठोर भूमिका घ्यावी स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकार यावर पाऊले उचलत आहे, मात्र आता आणखी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कठोर भुमिका घेण्यास सांगेन. यासोबत त्यांनी प्रयागराज येथे कुंभ आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भागवतांचे वक्तव्य काय? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, काही लोक मंदिर मशिदशी संबंधित मुद्दा उपस्थित करतात जेणेकरुन ते स्वत ला हिंदूंचे नेते म्हणुन प्रस्थापित करु शकतील. विषेशत राम मंदिराच्या संदर्भात अशा गोष्टी अधिक दिसत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment