राऊत यांचा फडणवीसांवर पलटवार:अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा आता शिपाई झाला म्हणत शरद पवारांच्या पत्राचा दावा फेटाळला

राऊत यांचा फडणवीसांवर पलटवार:अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा आता शिपाई झाला म्हणत शरद पवारांच्या पत्राचा दावा फेटाळला

देवेंद्र फडणवीस हे सध्या गोंधळलेले व्यक्तिमत्व आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा आता शिपाई झाला आहे. त्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाचे अध:पतन केले आहे. अडीच वर्षे तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केले, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 2019 मध्ये लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटी बाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पत्राला जबाबदार धरले आहे. यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. आमचे सरकार बनत असताना देवेंद्र फडणवीस यांना काहीही माहिती नव्हते. त्यामुळे त्यांना धक्का बसला होता. ते पडता पडता वाचले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत, हे त्यांना समजल्यावर त्यांना वाटले की शिवसेना काय करणार? आमच्या पायाशी येणार, अशी त्यांची भूमिका होती. मात्र राजकारण शिवसेनेलाही करता येते. आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून तुम्ही आमचे सरकार पाडले. पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे सरकार टिकावे अशी पवार आणि आमची कमेंटमेंट होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांना खोटे बोलण्याचा रोग लागलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. 25 वर्षे शिवसेनेबरोबर युती असताना देखील त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. या प्रक्रियेमध्ये मी होतो. त्यामुळे मला सर्व माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितले जात होते. मात्र जे ठरलेले आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असा आमचे म्हणणे होते. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्या पत्रामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. ते पत्रच माझ्या कार्यालयात टाईप झाले होते, असा गैप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे करू शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबतची चर्चा केवळ शरद पवार आणि माझ्यात झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यात उगाच नाक खूपसू नये, त्यांना काहीच माहिती नव्हते. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. शरद पवारांबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे गौप्यस्फोट:शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राचाही केला उल्लेख; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पत्राबाबत राज्यातील राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा… मुख्यमंत्री होणे आता माझ्यासाठी गौण विषय!:मी त्या शर्यतीतही नाही; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा राज्याचा मुख्यमंत्री होणे आता माझ्यासाठी गौण विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही. आणि असलीच तर त्या शर्यतीत मी सहभागी नाही. असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे भाष्य केले आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणात प्रमुख भूमिकेत असणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment