रेक्टरच्या छळाला कंटाळून नाशिकमध्ये पॉलिटेक्निकच्या तरुणीने घेतला गळफास:वसतिगृहातच उचलले पाऊल

रेक्टरच्या छळाला कंटाळून नाशिकमध्ये पॉलिटेक्निकच्या तरुणीने घेतला गळफास:वसतिगृहातच उचलले पाऊल

अभियांत्रिकी पदविकेचे (पॉलिटेक्निक) शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या महाविद्यालयाच्या वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अस्मिता संदीप पाटील (१८, मूळ रा. मुळाणे, सध्या राहणार ताहाराबाद, ता. सटाणा) असे तिचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी महाविद्यालय प्रशासनास जाब विचारला. तसेच रेक्टरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा व तिने लिहिलेली चिठ्ठी गायब केल्याचा आरोप केला. अस्मिता ही के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षण घेत होती. वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावर तिची खोली हाेती. सकाळी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत इतर मुलींना आढळला. त्यांनी ही बाब रेक्टरच्या निदर्शनास आणून दिली. आडगाव पोलिसांनाही कळवले. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. काही वेळात १० ते १५ वाहनांद्वारे नातेवाईक महाविद्यालयात जमा झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढत तक्रार देण्यास सांगितले. संबंधितांविराेधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. कॉलेजचे कर्मचारी, व्यवस्थापनाचा घटनेशी संबंध नाही मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असावी आणि वसतिगृहाच्या रेक्टरने ती गायब केली, असा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला. संबंधित रेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर वरिष्ठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेजचे संचालक अजिंक्य वाघ म्हणाले, मुलीच्या कुटुंबीयांच्या सर्व आरोपांची चौकशी पोलिसांसह व्यवस्थापनाकडूनही केली जाईल. कॉलेजचे कर्मचारी, व्यवस्थापनाचा या घटनेशी प्रथमदर्शनी कोणताच संबंधि नाही.

​अभियांत्रिकी पदविकेचे (पॉलिटेक्निक) शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या महाविद्यालयाच्या वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अस्मिता संदीप पाटील (१८, मूळ रा. मुळाणे, सध्या राहणार ताहाराबाद, ता. सटाणा) असे तिचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी महाविद्यालय प्रशासनास जाब विचारला. तसेच रेक्टरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा व तिने लिहिलेली चिठ्ठी गायब केल्याचा आरोप केला. अस्मिता ही के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षण घेत होती. वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावर तिची खोली हाेती. सकाळी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत इतर मुलींना आढळला. त्यांनी ही बाब रेक्टरच्या निदर्शनास आणून दिली. आडगाव पोलिसांनाही कळवले. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. काही वेळात १० ते १५ वाहनांद्वारे नातेवाईक महाविद्यालयात जमा झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढत तक्रार देण्यास सांगितले. संबंधितांविराेधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. कॉलेजचे कर्मचारी, व्यवस्थापनाचा घटनेशी संबंध नाही मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असावी आणि वसतिगृहाच्या रेक्टरने ती गायब केली, असा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला. संबंधित रेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर वरिष्ठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेजचे संचालक अजिंक्य वाघ म्हणाले, मुलीच्या कुटुंबीयांच्या सर्व आरोपांची चौकशी पोलिसांसह व्यवस्थापनाकडूनही केली जाईल. कॉलेजचे कर्मचारी, व्यवस्थापनाचा या घटनेशी प्रथमदर्शनी कोणताच संबंधि नाही.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment