प्रेयसीच्या पतीच्या खुनाबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा:खर्डा येथील घटना, मृताची पत्नी व एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका
प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या प्रियकरास श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा व १३ हजार रुपये दंड केला. कृष्णा संजय सुर्वे, असे जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील मृताच्या पत्नीसह दोघांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या घटनेत विशाल ईश्वर सुर्वे (वय २६, रा. खर्डा, ता. जामखेड) याचा मृत्यू झाला होता. खर्डा येथील विशाल ईश्वर सुर्वे हा १३ मे २०२२ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घराकडे जात होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. तात्कालिन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवून मृताची पत्नी, आरोपी कृष्णा सुर्वे व त्याच्या मित्रास या प्रकरणात अटक केली. तपासादरम्यान, मृताची पत्नी व आरोपी कृष्णा सुर्वे यांचे अनैतिक संबंध होते. त्यात विशाल सुर्वे याचा अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करण्याचा कट रचण्यात आला. विशाल हा आपली रिक्षा घेऊन घरी येत असताना, लक्ष्मीआई मंदिराजवळ कृष्णा सुर्वे याने मित्राच्या मदतीने विशालच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केली. त्यात त्याचा जागीच मुत्यू झाला. दरम्यान, तिन्ही आरोपींविरोधात अडीच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. नंतर त्यातील काही साक्षीदार फुटीर झाले. पोलिसांसह इतरांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे, सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी कृष्णा सुर्वे यास जन्मठेप व १३ हजार दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, सबळ पुराव्याअभावी मृताची पत्नी व आरोपीच्या मित्राची निर्दोष सुटका करण्यात आली. आरोपी कृष्णा सुर्वे