खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याची दोन अज्ञातांकडून रेकी:भांडुप पोलिसात तक्रार दाखल; तपास सुरु

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या बंगल्याची दोन अज्ञातांनी रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात दोघेही मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी राऊत यांच्या बंगल्याचे फोटोही काढले. बंगल्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भांडुप पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांच्या बाबतील ही गंभीर घटना समोर आली आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ या बंगल्याची दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली आहे, अशी माहीती समोर आली. संजय राऊत यांच्या बंगल्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसले आहे की, दोन दुचाकीस्वर त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजुला येऊन त्यांनी बंगल्याचे फोटो काढले. संजय राऊत यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेलेले असल्याची माहीती समोर आली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गेल्या पाच वर्षांपासून न चुकता संजय राऊत हे राष्ट्रीय आणि देशाच्या राजकारणावर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतात. यात राऊत हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करतात आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. प्रकरणाची चौकशी सुरु हा सर्व प्रकार घडल्यानंतर स्थानिक पोलिस हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा होती. मात्र, आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आता केवळ एक काँन्सटेबल त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. संजय राऊत यांनी देखील या बाबत खुलासा केला आहे की, असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. तर या आधीही 3 वेळेस बंगल्याची रेकी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. संशयितांकडे दहा मोबाईल होते – सुनील राऊत या संदर्भात संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत म्हणाले की, मी नागपुरहून आज सकाळी मुंबईत आलो. घरी गेल्यानंतर सर्व प्रसार माध्यमांचे लोक तेथे उपस्थित होते. त्यातल्या एका माणसाने मला सांगितले की, एका दुचाकीवरील दोन अज्ञान व्यक्तींनी बंगल्याची शुटींग केली. त्यांच्याकडे दहा मोबाईल होते. एका व्यक्तीने त्यांना हटकल्यामुळे त्यांनी तेथुन पळ काढला. त्यांच्यावर गुन्हा करण्यात आलेला आहे. त्याबाबत पोलिस चौकशी करत आहे. ती दुचाकी युपी किंवा बिहारची असावी, अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे. आम्हाला कुणावरही संशय नाही परंतू संजय राऊत साहेबांची काळजी आम्हाला असल्याचेही सुनील राऊत यांनी म्हटले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment