रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ‘उडवण्याची’ धमकी:रशियन भाषेतील ईमेलने खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क
रशियन भाषेतील ईमेलने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ‘उडवण्याची’ धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल रशियन भाषेत असल्याने याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ला उडवण्याच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये सतर्कता वाढली आहे. गुरुवारी दुपारी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ई-मेल आला आहे. ज्यामध्ये बँक उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल रशियन भाषेत पाठवण्यात आला होता, त्यामुळे हे प्रकरण अधिकच संशयास्पद आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ई-मेल तपास आणि पोलिस कारवाई धमकी मिळाल्यानंतर माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ई-मेलमधील मजकुराचे विश्लेषण सुरू केले असून, त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आरबीआयच्या वेबसाइटवर धमकी मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. पोलिसांना ई-मेलमध्ये बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाली, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षा उपाय लागू केले आणि तपास सुरू केला आहे. रशियन भाषेत धमकी ई-मेल रशियन भाषेत असल्याने प्रकरण आणखी गंभीर असल्याचे मानले जात आहे. ही धमकी वैयक्तिक कृत्य आहे की काही आंतरराष्ट्रीय संशयित गटाने पाठवली आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. ई-मेलचा स्त्रोत कुठून आला आणि कोणी पाठवला याचाही तपास आता पोलिस करत आहेत. याशिवाय ई-मेलमध्ये दिलेली बॉम्बची माहिती खरी धमकी आहे की, खोटी माहिती आहे, याचाही तपास सुरू आहे. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…