निवृत्तीनंतर त्यांनी भरवली वीट भट्ट्यांवरच्या मुलांसाठी शाळा:स्वखर्चातून दोन शिक्षिका नियुक्त; अलियाबाद परिसरात समर्पणच्या माध्यमातून मजुरांची मुले शैक्षणिक प्रवाहात

कोणाला कशात आनंद मिळेल, हे सांगता येत नाही. कुणी चैनीच्या वस्तूंच्या आधारे आनंद शोधतो तर कुणी दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात अधिक स्वारस्य राखते. अमरावतीच्या दुर्लक्षित भागात राहणाऱ्या शोभा गुणवंत तायडे यांनी मुंबईच्या महालेखागार कार्यालयातून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शाळा चालवण्याचे व्रत स्वीकारत समाजासाठी एक आदर्श निर्माण केला. विशेष या मुलांना शिकवण्यासाठी स्वखर्चातून दोन शिक्षिकांचीही नेमणूक केली आहे. समर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने त्यांचा हा उपक्रम चालतो. स्वत:च्या निवृत्तिवेतनातून यासाठीचा खर्च भागवतात. कोरोना काळाचा अपवाद सोडला तर २०१७ पासून हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. या उपक्रमाने प्रेरित होऊन पुण्याच्या डोअर स्टेप स्कूल अर्थात ‘डीएसएस’ या संस्थेने मदतीचा हात पुढे केला होता. परंतु कालांतराने ही मदत सदासर्वकाळ सुरू ठेवणे शक्य नसल्याचे म्हणत त्यांनी माघार घेतली. परिणामी वाढवलेल्या तीन शिक्षिका व एक समन्वयक कमी करून कमी मुलांसह शाळा चालवण्याचे त्यांचे व्रत अखंड सुरू आहे. शोभा तायडे यांच्या मते, आतापर्यंत त्यांच्या शाळेने किमान ७० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. अंजनगाव बारी रस्त्यावरील अलियाबाद परिसरात वीट भट्ट्यांचे मोठे जाळे आहे. याच भागात त्यांनी आपली झोपडी उभारून त्यात वर्ग भरवणे सुरू केले. वीट भट्ट्यांवर कामाला येणारे मजूर साधारणत: ऑक्टोबरमध्ये येथे येतात आणि मेअखेर आपापल्या गावी परत जातात. येताना {उर्वरित. पान ४ तिघांना दत्तकही घेतले शोभा तायडे यांनी केवळ शाळा भरवून वीट भट्ट्यांवरील मजुरांच्या मुलांसाठी शाळाच सुरू केली नाही, तर स्वत: तीन मुले दत्तक घेऊन त्यांचाही सांभाळ सुरू केला. या तिन्ही मुला-मुलींचा संपूर्ण खर्च त्या स्वत: करतात. त्यांचे पती स्टेट बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झाले आहेत. त्यांचे निवृत्तिवेतनही समर्पणच्या कामासाठी खर्च केले जाते.