रोहित पवार यांचा राम शिंदेंना टोला:म्हणाले- मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, पण काहीजण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात

मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झालेत. पण काहीजण हे केस काळे करतात आणि तरुणांसारखे फिरतात. कारण त्यांना तरुणांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा टोला रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांना लगावला आहे. ते अहमदनगरच्या मिरजगाव येथे बोलत होते. नको त्या गोष्टीवरून राजकारण करू नये
राम शिंदे म्हणाले होते की, रोहित पवार हे मुलांना चॉकलेट देतात. मी माझ्या लहान भावा-बहिणींना चॉकलेट देत असेल तर त्यात तुम्हाला वाईट का वाटते? असा सवालही रोहित पवार यांनी केला. तसेच पवार म्हणाले की, नको त्या गोष्टींवरून राजकारण करू नये. रोहित पवार म्हणाले- मी मतदारसंघामध्ये 260 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला. तरीदेखील मला अनेक भागात कमी मतदान मिळाले, पण मी याचा कधीही विचार केला नाही. कोणताही भेदभाव न करता मी काम करत राहिलो. सायकल वाटताना देखील मी कुठलाही भेदभाव केला नाही. अनेक विरोधकांच्या मुलामुलींना सायकली मिळाल्या. पण त्या लहान मुलांना राजकारणाविषयी काय देणेघेणे आहे. ज्या ठिकाणी राजकारण करायचे त्याच ठिकाणी राजकारण करावं, निवडणूक झाल्यावर समाजकार्य करावं, असे त्यांनी म्हटले आहे. मनीष सिसोदिया आणि माझ्यात एक साम्य – रोहित पवार
पवार पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया आणि माझ्यात एक साम्य आहे. त्यांच्यावरही ईडीची कारवाई झाली आणि माझ्यावरही कारवाई झाली. मात्र फरक एवढाच आहे की, सिसोदिया 17 महिने जेलमध्ये गेले होते, मी गेलो नाही. पण पुढे काय होणार माहिती नाही. रोहित पवार चांगले शिक्षणमंत्री होतील- मनीष सिसोदिया
मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जामखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या 10 वर्गखोल्यांचे उद्घाटन व 5 वर्ग खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिसोदिया यांनी आमदार रोहित पवार यांचे चांगलेच कौतुक केले. मनीष सिसोदिया म्हणाले, सध्या राजकारणात कुणीही शिक्षण व्यवस्थेवर काम करण्यास तयार नाही. सत्तेत आल्यानंतर नेते सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम खाते कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतात. त्या खात्याचा मंत्री होण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागते. पण शिक्षण देणाऱ्या खात्याचा कुणीही विचार करत नाही. पण आमदार रोहित पवार यांची शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांविषयीची तळमळ पाहता भविष्यात त्यांना शिक्षणमंत्रीपदाची संधी मिळाली तर ते महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा कायापालट करतील. रोहित पवार यांनी शाळेच्या वर्गखोल्या बांधल्या आणि त्याचे लोकार्पण दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला करण्याची संधी दिली. हा एक नवा आदर्श त्यांनी आज घालून दिला. वाचा सविस्तर बातमी…

​मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झालेत. पण काहीजण हे केस काळे करतात आणि तरुणांसारखे फिरतात. कारण त्यांना तरुणांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा टोला रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांना लगावला आहे. ते अहमदनगरच्या मिरजगाव येथे बोलत होते. नको त्या गोष्टीवरून राजकारण करू नये
राम शिंदे म्हणाले होते की, रोहित पवार हे मुलांना चॉकलेट देतात. मी माझ्या लहान भावा-बहिणींना चॉकलेट देत असेल तर त्यात तुम्हाला वाईट का वाटते? असा सवालही रोहित पवार यांनी केला. तसेच पवार म्हणाले की, नको त्या गोष्टींवरून राजकारण करू नये. रोहित पवार म्हणाले- मी मतदारसंघामध्ये 260 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला. तरीदेखील मला अनेक भागात कमी मतदान मिळाले, पण मी याचा कधीही विचार केला नाही. कोणताही भेदभाव न करता मी काम करत राहिलो. सायकल वाटताना देखील मी कुठलाही भेदभाव केला नाही. अनेक विरोधकांच्या मुलामुलींना सायकली मिळाल्या. पण त्या लहान मुलांना राजकारणाविषयी काय देणेघेणे आहे. ज्या ठिकाणी राजकारण करायचे त्याच ठिकाणी राजकारण करावं, निवडणूक झाल्यावर समाजकार्य करावं, असे त्यांनी म्हटले आहे. मनीष सिसोदिया आणि माझ्यात एक साम्य – रोहित पवार
पवार पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया आणि माझ्यात एक साम्य आहे. त्यांच्यावरही ईडीची कारवाई झाली आणि माझ्यावरही कारवाई झाली. मात्र फरक एवढाच आहे की, सिसोदिया 17 महिने जेलमध्ये गेले होते, मी गेलो नाही. पण पुढे काय होणार माहिती नाही. रोहित पवार चांगले शिक्षणमंत्री होतील- मनीष सिसोदिया
मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जामखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या 10 वर्गखोल्यांचे उद्घाटन व 5 वर्ग खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिसोदिया यांनी आमदार रोहित पवार यांचे चांगलेच कौतुक केले. मनीष सिसोदिया म्हणाले, सध्या राजकारणात कुणीही शिक्षण व्यवस्थेवर काम करण्यास तयार नाही. सत्तेत आल्यानंतर नेते सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम खाते कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतात. त्या खात्याचा मंत्री होण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागते. पण शिक्षण देणाऱ्या खात्याचा कुणीही विचार करत नाही. पण आमदार रोहित पवार यांची शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांविषयीची तळमळ पाहता भविष्यात त्यांना शिक्षणमंत्रीपदाची संधी मिळाली तर ते महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा कायापालट करतील. रोहित पवार यांनी शाळेच्या वर्गखोल्या बांधल्या आणि त्याचे लोकार्पण दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला करण्याची संधी दिली. हा एक नवा आदर्श त्यांनी आज घालून दिला. वाचा सविस्तर बातमी…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment