रोखठोक मत:जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात; धर्माबाबत बोलणार नाही -गडकरी

रोखठोक मत:जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात; धर्माबाबत बोलणार नाही -गडकरी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी असेच वक्तव्य केले. ते म्हणाले, “जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात. मी सार्वजनिक ठिकाणी धर्म आणि जातीबद्दल बोलत नाही. समाजसेवा प्रथम येते. मी निवडणूक हरलो किंवा माझे मंत्रिपद गमावले तरी मी या तत्त्वावर ठाम राहीन. जर मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी मरणार नाही.’
गडकरी म्हणाले, आम्ही कधीही जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. मी राजकारणात आहे आणि इथे अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. पण मी माझ्या पद्धतीने गोष्टी करायचे ठरवले आहे. मला कोण मतदान करेल याची मला चिंता नाही. माझ्या मित्रांनी सांगितले की, सार्वजनिक जीवनात असताना तुम्ही हे बोलायला नको होते. पण मी आयुष्यात हे तत्त्व पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तरी मी मरणार नाही. जर एखादा मुस्लिम आयपीएस किंवा आयएएस झाला तर सर्वांची प्रगती होईल. गडकरी म्हणाले की, ते आमदार असताना त्यांनी एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची परवानगी अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) ला हस्तांतरित केली होती. मुस्लिम समुदायाला त्याची जास्त गरज आहे, असे त्यांना वाटले. ते म्हणाले की, जर मुस्लिम समुदायातून अधिक अभियंते, आयपीएस आणि आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल. शिक्षण जीवन बदलू शकते
गडकरी म्हणाले, “आपल्याकडे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आहे. आज हजारो विद्यार्थी अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली अभियंते बनले आहेत. जर त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसती तर काहीही झाले नसते. ही शिक्षणाची शक्ती आहे. ते जीवन आणि समुदाय बदलू शकते.’
मराठवाडा दुग्ध उत्पादक संघटना, खाद्यतेल केंद्राचा नागपुरात शुभारंभ सोलापुरातून ८० लाख लिटर दूध उत्पादन – गडकरी नागपूर | कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या एकेका जिल्ह्यांत ७० ते ८० लाख लिटर्स दूध उत्पादन होते. विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हा सोडले तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दूधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केले.
मराठवाडा दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ, धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लँटच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लँट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.पी. देवानंद, मराठवाडा दुग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण यांची उपस्थिती होती. मदर डेअरीने चांगल्या वाणासाठी पुढाकार घ्यावा मदर डेअरीने आता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने येथील स्थानिक गो-पालकांच्या गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मदर डेअरीमार्फत पशुवैद्यकीय तज्ज्ञ एम्ब्रिओ ट्रान्सफर तसेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसेच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करावे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment