‘सामना’ हे काँग्रेसचे मुखपत्र झाले:शिवसैनिकही वाचत नाहीत, त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही; नीतेश राणेंची संजय राऊतांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे, असा दावा संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमधून केला. शिंदे गटाचे एक आमदार विमान प्रवासात भेटले, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे गोंधळ अजून वाढला, असे त्यांनी म्हटले. यावरून भाजप आमदार नीतेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. सामना आजकाल शिवसैनिक देखील वाचत नाही. कारण ते काँग्रेसचे मुखपत्र झालेले आहे. त्यामुळे त्याची दखल घेणे गरजेचे वाटत नसल्याचे नीतेश राणे म्हणाले. दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाची लायकी आणि स्वत:च्या पक्षात स्वत:चे स्थान त्यांनी पाहावे, असा घणाघात राणे यांनी केला. नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत यांना पुढच्या वेळी ठाकरे गटातून त्यांना खासदार होणे शक्य नाही, त्यामुळे त्यांचे असे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाची लायकी आणि स्वत:च्या पक्षात स्वत:चे स्थान त्यांनी पाहावे. मालकाच्या पक्षात किती काळ राहणार याबाबत संजय राऊत यांनी महाराष्ट्राला उत्तर दिले पाहिजे, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली. राऊत कितीकाळ उबाठामध्ये राहतील?
नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत पहिल्या दिवसापासून दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याचे काम करत आहे. दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन मुलांची नावे ठेवत आहे. एकनाथ शिंदे काय करताय? भाजपमध्ये काय चाललंय? हे सांगण्यापेक्षा त्यांनी स्वत: कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा. उबाठा गटामध्ये अस्वस्थता आहे. संजय राऊतपासून ही अस्वस्थाता सुरू आहे. कधीतरी मातोश्रीवर जाऊन विचारा. सामनाचे सो कॉल्ड कार्यकारी संपादक किती काळ उबाठामध्ये राहतील, दिवस मोजा. आधी स्वत:च्या बुडाखालील आग बुझवा
मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे मातोश्रीमध्ये काळाजादू केली जात असल्याचा दावा नीतेश राणे यांनी केला. मातोश्रीमध्ये किती लिंबू फोडले जात आहे, किती काळी जादू केली जातीये, किती उपवास ठेवले जात आहेत, याबाबतही सामनामध्ये लेख लिहा, असे आव्हान नीतेश राणे यांनी संजय राऊतांना केले. मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी किती बुवांकडे जाण्यास सुरुवात केली, याबाबतही महाराष्ट्राला माहिती द्यायला पाहिजे. दुसऱ्यांबद्दल बोलण्यापेक्षा स्वत:च्या बुडाखालील आग बुझवा, असेही ते म्हणाले. सामना सकाळी पुसण्याठी वापरतात, काय ते विचारू नका
संजय राऊत यांना त्यांच्या घरचे पण जास्त गांभीर्याने घेत नाहीत. सामना वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो, कशाला पुसण्याठी वापरतात, याचा तुम्हीच विचार करा. सामना आजकाल शिवसैनिक देखील वाचत नाही. कारण ते काँग्रेसचे मुखपत्र झालेले आहे. त्यामुळे सामनाच दखल जास्त घेण्याची गरज नाही, अशी टीका नीतेश राणे यांनी केली.

  

Share