संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या:धर्मांतरण प्रकरणावर गाजले होते भाष्य

संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या:धर्मांतरण प्रकरणावर गाजले होते भाष्य

प्रसिद्ध शिवव्याख्याते ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजलेले नाही. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा सुध्दा झाला होता. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरण या सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment