झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचाप्रचार संपला:उद्या मतदान, 15 जिल्ह्यांत 43 मतदारसंघात 683 उमेदवार
झारखंड विधानसभेच्या एकूण ८१ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ४३ मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेथील प्रचार सोमवारी संपला, तर उर्वरित ३८ मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील ४३ जागांवर ६८३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन, आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता, राज्यसभा खासदार महुआ माझी, माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी व माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या सूनबाई पूर्णिमा दास यांच्यासारख्या काही दिग्गज उमेदवारांची परीक्षा आहे. झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी व भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यांच्यात झारखंडमध्ये खरी लढत होत आहे. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदींच्या ४, अमित शाह यांच्या ९ तर इंडिया आघाडीसाठी राहुल गांधी, लालू यादव यांच्याही सभा झाल्या. एनडीए : महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सोरेन सरकारच्या काळात वाढलेले बांगलादेशी घुसखोर, भ्रष्टाचार, खाण घोटाळा, मां-बेटी और रोटी सुरक्षा, आदिवासींचे कल्याण, त्यांच्या मुलींचे लग्न व स्पर्धा परीक्षेत पेपर लीकचे प्रकरण आदी मुद्द्यांवर एनडीएचा प्रचारात भर आहे. भाजपने महिलांना दरमहा २१०० रुपये अर्थसाह्य देण्याचीही घोषणा केली आहे. इंडिया : आदिवासी अस्मिता, महिलांना २५०० देणार इंडिया आघाडीच्या प्रचाराची सूत्रे झामुमोचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व त्यांची पत्नी कल्पना यांच्याकडे आहे. ‘एकही नारा, हेमंत दुबारा’ अशा घोषणा देत ते मते मागत आहेत. सोरेन सरकारने दिलेल्या योजना, आदिवासींचे अस्तित्व व संस्कृतीचे संरक्षण, जल-जंगल- जमिनीची सुरक्षा, मईया योजनेतून महिलांना दरमहा अर्थसाह्य १ हजार रुपयांवरून २५०० रुपये करणार या आश्वासनांवर त्यांचा प्रचार सुरू