सांगलीत माजी महापौरांचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न:सुरेश पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू, राजकीय वर्तुळात खळबळ

सांगली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र सुरेश पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुरेश पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरीच साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सुरेश पाटील यांना कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सुरेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले यावरून तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. सुरेश आदगोंडा पाटील हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून सांगलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणासह व्यापार, शिक्षणक्षेत्र आणि समाजकारणात सुरेश पाटील यांना आदराचे स्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरेश पाटील राजकारण तसेच सार्वजनिक कार्यक्रमांपासून अलिप्त राहत होते. गेल्या रविवारी त्यांच्याच संकल्पनेतून सुरू झालेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला ते उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी त्यांनी नेमीनाथनगर येथील त्यांच्या निवासस्थानी साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सुरेश पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा सुरेश पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. मात्र सुरेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करत आहेत.