मराठी माणसावरील हल्ले ही भाजपच्या अंताची सुरुवात:कल्याणमधील घटनेवरुन संजय राऊत संतापले; फडणवीसांचे सरकार अपशकुनी असल्याचा आरोप

मराठी माणसावरील हल्ले ही भाजपच्या अंताची सुरुवात:कल्याणमधील घटनेवरुन संजय राऊत संतापले; फडणवीसांचे सरकार अपशकुनी असल्याचा आरोप

नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी संघटना फोडून मराठी माणसाला कमजोर करण्याचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसावरील हल्ले वाढले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटज्ञचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे नाव आणि शिवसेनेचे चिन्ह या ‘नामर्द’ लोकांना दिले, त्यांना कालच्या घटनेविषयी संवेदना आहेत का? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. मुंबईत मराठी माणसांवरील झालेल्या हल्ल्या संदर्भात राऊत यांनी सरकावर हल्ला चढवला. मराठी माणसावरील हल्ले ही भाजपच्या अंताची सुरुवात असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. कल्याण मध्ये काल मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे. शिवसेना म्हणून सरकारमध्ये नामर्द लोक बसले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईचे गुजरातीकरण करण्याचे, उत्तर भारतीयकरण करण्याचे राष्ट्रीय कारस्थान असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवली? असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. फडणीस यांचे अपशकुनी सरकार देवेंद्र फडणीस यांचे सरकार अपशकुनी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात, जिल्ह्यात दरोडे, हत्या आणि अपघात होत आहेत. काल कल्याण मध्ये देखील मराठी माणसांची हत्या होणार होती. मात्र ते वाचले. मुंबईमध्ये ठीक ठिकाणी मराठी माणसा विरोधात कारस्थान रचनेचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. खासदार सारंगी म्हणजे नटरंगी नार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात देशाचे गृहमंत्री अपशब्द वापरतात आणि त्यावर आवाज उठवल्यानंतर ताक दाबला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ही सत्तेची मस्ती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी झगडत आहोत. आता भविष्यात तुम्ही कोणावर हल्ला करणार? हिम्मत असेल तर आमच्यावर हल्ला करून दाखवा? असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे. खासदार सारंगी यांना मी चांगले ओळखतो. त्यांचे बॅकग्राऊंड तुम्ही तपासून घ्या, त्यांना नाटक कंपनीचा पुरस्कार द्यायला हवा. भारतीय जनता पक्ष ही नाट्य शाळा असल्याचे देखील राऊत यांनी केला. मराठीमध्ये त्यांना ‘नटरंगी नार’ म्हणतात. आम्ही त्यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत होतो. ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळेस राहुल गांधी ते उपस्थित नव्हते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment