संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र:मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप; ईडी मार्फत तपास करण्याची मागणी

संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र:मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप; ईडी मार्फत तपास करण्याची मागणी

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री जयकुमार रावल यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जनता सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. रावल यांनी आपल्या नातेवाईकांना कर्ज दिल्यामुळे बँक बंद पडली, असा आरोप ही त्यांनी केला. इतकेच नाही तर राजकीय दबावामुळे या प्रकारचा तपास होऊ शकला नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात या प्रकरणाचा ईडी मार्फत तपास करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. सरकारमधील मंत्र्यांची भ्रष्टाचाराचे प्रकरणे दाबण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण समोर आणले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्याला उत्तेजन देण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. जयकुमार रावल यांनी बँकेमधील जवळजवळ 180 ते 190 कोटी रुपये आपल्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे दिले आहेत. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असताना गुजरातमध्ये नातेवाईकांना पैसे दिले गेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यातून ती बँक बंद पाडली. या संदर्भात तपास करण्यासाठी ज्या एसआयटीची स्थापन करण्यात आली. त्या एसआयटीच्या तपासात देखील आरोप आरोपी क्रमांक तीन हे जयकुमार रावल असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सहीमुळे रावल यांची अटक टाळण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. गुजरातमधील नातेवाइकांनाही कोट्यवधी रुपये दिले राजकीय मंडळीच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील अनेक सहकारी व नागरी बँकांचे वाटोळे झाले व त्यात सामान्य ठेवीदारांचे अतोनात नुकसान झाल्याचे रोज समोर येत आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या न्यू इंडिया बँकेतही अशाच मनमानी, बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप झाल्याने हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले व त्यातील आरोपी मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत. दोंडाईच्या जनता सहकारी बँक (कै. दादासाहेब रावल जनता सरकारी बँक) या बँकेत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली. बिगर गॅरंटीचे कर्ज वाटप कोणतीही गॅरंटी न घेता ९८ कोटीचे कर्ज वाटप आपल्या जवळच्याच नातेवाईकांना बँकेच्या राजकीय मालकांनी दिले. इतकेच नव्हे तर बँकेच्या कार्य क्षेत्राबाहेर गुजरातमधील नातेवाइकांनाही कोट्यवधी रुपये दिले. हे गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य आपल्या मंत्रिमंडळातील जयकुमार रावल यांनी केले. या प्रकरणाचा निःपक्ष तपास राजकीय दबावामुळे होऊ शकला नाही. असा आरोपही राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment